साहित्य-
पेने पास्ता - 250 ग्रॅम
हेवी क्रीम - 1 कप
चीज - 1 कप
लोणी - 2 टेस्पून
ऑलिव्ह तेल - 1 टेबलस्पून
चवीनुसार मीठ
मिरेपूड
बोनलेस चिकन ब्रेस्ट - 2
लसूण पाकळ्या
कोथिंबीर
कृती-
सर्वात आधी पास्ता उकळायला ठेवावा. पास्ता चांगला भिजला जाईल याची काळजी घ्यावी. तसेच नंतर एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात चिकन सोनेरी आणि पूर्णपणे शिजेपर्यंत फ्राय करून घ्यावे. यानंतर ते एका प्लेटमध्ये काढून ठेवावे.आता त्याच पॅनमध्ये बटर घालावे आणि लसूण घालून हलका तपकिरी होईपर्यंत परतवू घ्यावा. आता हेवी क्रीम आणि चीज घालून मिक्स करावे. या सॉसमध्ये शिजवलेला पास्ता आणि चिकन मिक्स करावे. मीठ आणि मिरपूड घालावी. आता वरून कोथिंबीर घालावी. तर चला तयार आहे आपला क्रीमी चिकन अल्फ्रेडो पास्ता, गरम नक्कीच सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik