पूर्वतयारी : अंडे अलगदपणे फोडून एका पातेल्यात द्रावण काढावे. चमच्याने द्रावण चांगले फेटून घ्यावे. कांदा चिरून घ्यावा. लसूण, जीरे व आल्याची पेस्ट बनवून घ्यावी.
कृती : गॅसवर कढई ठेवावी. कढईत तेल घालून तापू द्यावे. तापलेल्या तेलात कांदा सोडावा. कांदा तांबूस होईपर्यंत भाजावा. लसूण, जिरे व आल्याची पेस्ट कढईत घालून तळावी. या मिश्रणात वाटलेल्या हिरव्या मिरच्यांचा ठेचा घालून तळावा. संपूर्ण मिश्रण तेलात चांगले घोळून घ्यावे. अंड्याचे फेटलेले द्रावण यात घालावे व चमच्याने घोळत रहावे. हिरवी कोथिंबीर व हिरव्या कांद्याची पात, थोडा गरम मसाला घालून संपूर्ण मिश्रण चमच्याने परतवून घ्यावे. मिश्रण मोकळे होईपर्यत ही कृती करत रहावी. अंडा भुर्जीचा सुगंध नाकात दरवळू लागला की समजावे भुर्जी तयार !