गार्लिक चिकन पास्ता रेसिपी
, गुरूवार, 9 जानेवारी 2025 (16:52 IST)
साहित्य-
पास्ता - दोन कप
चीज - एक टीस्पून
लसूण पाकळ्या
बोनलेस चिकन - एक कप
तिखट - अर्धा टीस्पून
तेल - गरजेनुसार
क्रीम - एक टीस्पून
ओवा
चिली फ्लेक्स
कृती-
सर्वात आधी पास्ता एका पॅनमध्ये गरम पाण्यात उकळवून घ्यावा. आता त्यात थोडे तेल घाला जेणेकरून पास्ता एकमेकांना चिकटणार नाही.आता चिकन नीट स्वच्छ करा आणि मध्यम आचेवर गरम पाण्यात चांगले उकळवून घ्या.यानंतर, आता एका पॅनमध्ये तेल गरम करावे, त्यात चिरलेला लसूण आणि तिखट घालावे व परतवून घ्यावे. आता त्यामध्ये उकडलेले चिकन घालावे व चांगल्या प्रकारे शिजवून घ्यावे.तसेच आता पास्ता आणि मीठ घालून शिजवून घ्यावे. नंतर त्यात क्रीम घालावे व परतवून घ्यावे. तसेच आता तळलेला लसूण घालून गॅस बंद करावा. तर चला तयार आहे आपला गार्लिक चिकन पास्ता रेसिपी, गरम नक्कीच सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik
पुढील लेख