Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

खीमा समोसा

वेबदुनिया
साहित्य : अर्धा किलो मटण खीमा, ६ ते ७ हिरव्या मिच्र्या, एक छोटा तुकडा आलं, १० ते १२ पाकळ्या लसून, २-३ कांदे बारीक चिरून ते खिम्यामध्ये कच्चेच मिक्स करा अर्धा चमचा हळद, दोन वाटय़ा गव्हाचे पीठ, पाव किलो तेल, चवीपुरते मीठ.

कृती : सर्वप्रथम खीमा स्वच्छ धुऊन घ्या, त्यात आल, लसुन व हिरव्या मिच्र्याची पेस्ट, हळद, मीठ घाला. मिश्रण मंद गॅसवर शिजत ठेवा, ते मिश्रण सुखे होईपर्यंत शिजवा. मिश्रण थंड झाले की त्यात बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर घाला व ते एकत्र करा. गव्हाचे पीठ मळा, दोन छोटे छोटे गोळे करा व एक चपाती बनवा. ती हलकीशी शेका. शेकल्यानंतर त्या दोन वेगवेगळ्या करा, अशा ७ ते ८ चपात्या बनवा नंतर त्याचे सुरीने उभे ४ भाग करा. एका छोटय़ाशा भांडय़ामध्ये गव्हाचे पीठ व पाणी घालून उकळी काढा ती पेस्ट समोसे चिकटवण्यासाठी उपयोगी येते. चपातीच्या केलेल्या भागामधला एक तुकडा घेऊन त्यात एक चमचा खीम्याचे मिश्रण घालून समोसाच्या आकाराचे बनवून व पेस्ट लावून समोसा बंद करा. नंतर कढईमध्ये मंद आचेवर डीप फ्राय करा.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Breast Size स्तनांचा आकार वाढवण्यासाठी दररोज करा हे योगासन, आकर्षण वाढेल

२९ मार्च रोजी शनि कुंभ राशीत अस्त करणार, ३ राशींना अडचणींना सामोरे जावे लागेल!

Surya Grahan 2025 वर्षातील पहिले सूर्यग्रहण भारतात दिसेल का? सुतक काळ आणि त्याचा परिणाम जाणून घ्या

उन्हाळ्यात भाजी खरेदी करताना या गोष्टी ठेवा लक्षात

घराच्या दिशेनुसार कोणती झाडे लावावीत

सर्व पहा

नवीन

चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणण्यासाठी व्हिटॅमिन ई कॅप्सूल वापरण्याऐवजी या गोष्टी खा

वजन कमी करण्यासाठी जगातील सर्वोत्तम व्यायाम कोणता आहे? जाणून घ्या काय फायदे आहेत

शीर्षासन करण्याची पद्धत, फायदे आणि तोटे जाणून घ्या

नैतिक कथा : मूर्ख शेळीची गोष्ट

800+ भारतीय मुलांसाठी संस्कृत नावे अर्थांसह

पुढील लेख
Show comments