Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 19 February 2025
webdunia

मटण कोरमा रेसिपी

Mutton Kurma
, बुधवार, 29 जानेवारी 2025 (13:58 IST)
साहित्य-
मटण - 500 ग्रॅम
कांदे - 2 बारीक चिरलेले
टोमॅटो - 2 प्युरी केलेले
दही - 3 टेबलस्पून
आले-लसूण पेस्ट - 1 टेबलस्पून
लाल तिखट - 1 टीस्पून
हळद पावडर - 1/2 टीस्पून
धणे पावडर - 1 टेबलस्पून
गरम मसाला - 1/2 टीस्पून
जिरे - 1/2 टीस्पून
लवंगा - 2
वेलची - 2
दालचिनीची काडी - 1   
कोथिंबीर  
तेल  
मीठ  
ALSO READ: स्मोकी चिकन रेसिपी
कृती-
सर्वात आधी मटण स्वच्छ धुवून त्याचे तुकडे करून घ्यावे. आता एका पॅनमध्ये तेल गरम करावे. त्यात जिरे, लवंग, वेलची आणि दालचिनी घाला. नंतर बारीक चिरलेला कांदा घाला आणि सोनेरी तपकिरी होईपर्यंत परतून घ्या. आता आले-लसूण पेस्ट घालावी. नंतर मटणाचे तुकडे घाला व परतून घ्या. आता मटणात लाल तिखट, हळद, धणे पूड घालावी. नंतर टोमॅटोची प्युरी आणि दही घालावे. आता हे मिश्रण झाकून ठेवा आणि मटण 15 मिनिटे शिजू द्या, म्हणजे मटण चांगले शिजेल आणि मसाले चांगले शोषले जातील.जर तुम्हाला मटणात जास्त ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही थोडे पाणी घालू शकता. चवीनुसार मीठ घाला आणि पॅन झाकून ठेवा आणि मटण आणखी 15 मिनिटे शिजू द्या. शेवटी गरम मसाला घाला आणि चांगले मिसळा. आता वरून कोथिंबीरीने गार्निश करावे. तर चला तयार आहे मटण कोरमा रेसिपी, पोळीसोबत नक्कीच सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Edited By- Dhanashri Naik

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अक्रोड चटणी रेसिपी