Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Sunday, 16 March 2025
webdunia

मसालेदार चिकन कॉर्न सूप

Spicy Chicken Corn Soup
, शनिवार, 15 मार्च 2025 (12:20 IST)
साहित्य-
बोनलेस चिकन - २०० ग्रॅम  
स्वीट कॉर्न - अर्धा कप  
चिकन स्टॉक - तीन कप
कांदा
लसूण पाकळ्या
आले  
हिरवी मिरची
सोया सॉस - एक टीस्पून
रेड चिली सॉस - अर्धा टीस्पून
व्हिनेगर - अर्धा चमचा
मिरेपूड - अर्धा टीस्पून
कॉर्न फ्लोअर - एक टीस्पून
चवीनुसार मीठ
बटर किंवा ऑलिव्ह ऑइल - एक टीस्पून
कोथिंबीर  
अंड्याचा पांढरा भाग    
ALSO READ: स्वादिष्ट हंडी चिकन रेसिपी
कृती-  
सर्वात आधी एका पॅनमध्ये चिकन स्टॉक गरम करा आणि त्यात चिकन घाला. ते मंद आचेवर दहा  मिनिटे शिजवा नंतर ते बाहेर काढा आणि त्याचे तुकडे करा. आता एका मोठ्या पॅनमध्ये बटर किंवा ऑलिव्ह ऑइल गरम करा. त्यात लसूण, आले आणि हिरवी मिरची घाला आणि हलके परतून घ्या. नंतर चिरलेला कांदा घाला आणि तो हलका गुलाबी होईपर्यंत परतून घ्या. आता स्वीट कॉर्न आणि उकडलेले चिकन घाला. सोया सॉस, लाल मिरची सॉस, व्हिनेगर, मीठ आणि काळी मिरी पावडर घाला आणि चांगल्या प्रकारे मिसळा. आता आता चिकन स्टॉक घाला आणि मंद आचेवर ५ मिनिटे शिजू द्या. तसेच कॉर्न फ्लोअर २ चमचे पाण्यात विरघळवून सूपमध्ये घाला आणि ढवळत राहा. तसेच सूपमध्ये अंड्याचा पांढरा भाग हळूहळू घाला आणि सतत ढवळत राहा. आता साधारण दोन मिनिटे उकळवा आणि गॅस बंद करा. त्यानंतर कोथिंबीर आणि मिरेपूड घालून शिजवा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: पंजाबी रारा मीट रेसिपी
Edited By- Dhanashri Naik

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

World Consumer Day 2025 जागतिक ग्राहक दिन माहिती