सांग आरशा मी दिसते कशी? आरसा म्हणतो - नजर बावरी - भिरभिरी - चेहऱ्यावर रोज नवी पुटकुळी, कोणाचा विचार करते गं? अशी कशाला लाजते गं? ।।3।।
ND
सांग आरशा मी दिसेन कशी? आरसा म्हणतो - '' नजर लाजरी गाली लाली - मागे पुढे आरशामध्ये मुरडून पाहते - कोणाची गं वाट पाहते. '' ।।4।।
सांग आरशा मी दिसेन कशी? आरसा म्हणतो - '' गळ्यात काळी पोत, तुझ्या भांगामध्ये सिंदूर साजे तुझ्या मागे आरशामध्ये - कोण रोज दिसते गं? '' ।।5।।
सांग आरशा मी दिसते कशी? आरसा म्हणतो - '' कडेवरची छोटी बाळी - गोली गोबरी बाळसेदार वीसच वर्ष झाली गं-तुलाच पुन: : पाहतो का? '' ।।6।।
पण आजकाल मीच म्हणते - '' आरशा - आरशा - थांब जरा - माझ्या बळीला मी न्हाऊ घालते दूध देते माझ्या बाळीचा ला अंगाई गाते सांगू नको रे - मी दिसते कशी ऐकण्यापुरताही वेळ नाही आरशा - आरशा थांब जरा।। 7।।
साभार : महाराष्ट्र साहित्य सभा, इंदूर यांच्या मालविका स्मरणिकेतून