Dharma Sangrah

बाप माझा विठ्ठल विठ्ठल

Webdunia
गुरूवार, 12 जुलै 2018 (15:34 IST)
जाडे भरडे कपडे घालून
दाळ-दाणा आणतो 
बाजार संपून जाऊसतोर 
बाप चकरा हाणतो
 
बैल होतो हमाल होतो 
कष्ट उपसतो खूप
बाप म्हणजे काळसावळ
विठलाचं रूप
 
ऊन नाही तहान नाही 
दिवस रात्र राबतो  
घर जातं झोपी पण
बाप एकटा जागतो 
 
लेकराच्या भल्यासाठी
अपमान गिळत राहतो 
पाटी आणि पेन्सिलकडे
बाप एकटक पाहतो 
 
पोराच्या डोक्यावरून 
फिरवतो झोपित हात 
खुशाल ठेव देवा म्हणून 
जोडीत राहतो हात 
 
दिसतो तेवढा बाप कधीच 
कठोर रागीट नसतो 
खरं सांगतो बाप म्हणजे 
आईचंच रूप असतो 
 
घळा घळा आसवं गाळून
मोकळी होते माय  
दुःख दाबून बाप दाबतो
सावकाराचे पाय
 
हो म्हणतो लेकरासाठी 
पडेल ते काम करील 
त्याला साहेब करण्यासाठी 
मी नाच करील 
 
खिळे काटे दगड गोटे
पायात घुसत जातात 
अंधारात त्याच्या वेदना
पाणी पाणी होतात 
 
कसं होईल काय होईल
चैन पडत नाही 
बाप नावाचा संत कधी
दिवसा रडत नाही 
 
फादरचा " डे " फक्त 
वर्षातून एकदा असेल का ?
बैल गोठ्यात बसल्यावर 
शिवार हिरवं दिसेल का ?
 
सारं दुःख पोटात गिळून
मानेवर " जू " घेतो
तोंडातून रक्त आलं तरी
गाडा ओढीत राहतो 
 
रक्ताचे थेंब दिसूने म्हणून 
तोच टाकतो माती 
बाप ज्याला कळतो त्याची 
फुटून जाती छाती
 
आमच्यासाठी काय केलं 
असं विचारू नका 
म्हाताऱ्या बैलावर 
वार करू नका 
 
बापाची तिरडी उचलण्या आधी 
पोरांनी शहाणं व्हावं 
बाप माझा विठ्ठल विठल
भजनी ठेक्यात गावं
 
प्रा.विजय पोहनेरकर

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

सर्व पहा

नवीन

Baby Boy Name Born in January जानेवारी 2026 मध्ये जन्म घेणार्‍या मुलांसाठी यूनिक नाव

Sunday Special Recipe स्वादिष्ट असा पंजाबी मसाला पुलाव

हिवाळ्यात दररोज हा रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा चहा प्या, त्याचे फायदे जाणून घ्या

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

हिवाळ्यात लांब केसांची काळजी घेण्यासाठी या टिप्स फॉलो करा

पुढील लेख
Show comments