Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गदिमा- पिढयापिढयांच्या निर्भय आम्ही, भारतीय भगिनी

पिढयापिढयांच्या निर्भय आम्ही
Webdunia
बुधवार, 29 जून 2022 (17:17 IST)
पिढयापिढयांच्या निर्भय आम्ही, भारतीय भगिनी
 
घराघरांचे दुर्ग झुंजवू, झुंजू समरांगणी ॥धृ०॥
 
अष्‍टभुजेच्या वंशज आम्ही, महिषासुर मारु
 
देवत्वाच्या गुढया उभारु, दानव संहारु
 
वलय होउनी वज्र नांदते, आमुच्या कर कंकणी ॥१॥
 
रणधीरांच्या सन्निध आम्ही स्फूर्तीसह राहू
 
रथचक्राच्या आसाठायी घालू निजबाहू
 
घडवू रामायणे, शत्रुचा मद उतरु रावणी ॥२॥
 
शस्‍त्रहि दिसते शोभुन आमुच्या शोभिवंत हाती
 
भौम मातता चारु त्याला सैन्यासह माती
 
स्त्रीहट्टाच्या बळे बहरवू स्वर्गसुखे अंगणी ॥३॥
 
रणयागांतरी सर्वस्वाच्या आहूती टाकू
 
अभिमन्यूंच्या बसू रथावर, अश्‍वाते हाकू
 
सती उत्‍तरेपरी आवरु डोळ्यांतच पाणी ॥४॥
 
जिजा, अहिल्या, झाशीवाली आमचीच रुपे
 
सुताऽवतारे जितली युद्‌धे अमुच्या संतापे
 
आ-शशितरणी स्वतंत्र राखू भारतीय धरणी ॥५॥
 
 
ग.दि. माडगूळकर

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नवीन

खाण्याव्यतिरिक्त, ही भाजी केसांसाठी देखील खूप फायदेशीर आहे, ती लावण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिला अशा प्रकारे त्यांचे मानसिक आरोग्य वाढवू शकतात, टिप्स जाणून घ्या

लॅपटॉपवर काम करताना मनगटाच्या वेदना कमी करण्यासाठी योगासन

लघु कथा : जादूचे पुस्तक

उन्हाळ्यात टिफिनमधून दुर्गंधी येते का? या ट्रिक अवलंबवा

पुढील लेख
Show comments