Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अखेर कमाई

kusumagraj
Webdunia
मध्यरात्र उलटल्यावर
शहरातील पाच पुतळे
एका चौथऱ्यावर बसले
आणि टिपं गाळू लागले .
 
ज्योतिबा म्हणाले ,शेवटी मी झालो
फ़क्त माळ्यांचा.
 
शिवाजीराजे म्हणाले ,
मी फ़क्त मराठ़्यांचा.
 
आंबेडकर म्हणाले ,
मी फ़क्त बौद्धांचा.
 
टिळक उद़्गारले ,
मी तर फ़क्त
चित्पावन ब्राम्हणांचा.
 
गांधींनी गळ्यातला गहिवर आवरला
आणि ते म्हणाले ,
तरी तुम्ही भाग्यवान.
एकेक जातजमात तरी
तुमच्या पाठीशी आहे.
माझ्या पाठीशी मात्र
फ़क्त सरकारी कचेऱ्यातील भिंती !
 
- कुसुमाग्रज

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ramayan : हनुमानजी आपली शक्ती का विसरले?

Kamada Ekadashi 2025: ८ एप्रिल रोजी कामदा एकादशी, तिथी मुहूर्त आणि व्रतकथा

आंघोळीच्या पाण्यात या 4 गोष्टी मिसळा, भरपूर पैसा मिळेल, प्रगती होईल !

उन्हाळ्यात दररोज एक कच्चा कांदा खा, उष्माघातापासून बचाव होईल, इतरही अनेक फायदे

गुलकंद करंजी रेसिपी

सर्व पहा

नवीन

काम इच्छा वाढवण्यासाठी ३ घरगुती उपाय

मारुतीला गोड रसरशीत बुंदी आणि इमरती स्वत:च्या हाताने तयार करुन अर्पण करा

कृत्रिम बुद्धिमत्तेवर निबंध Essay on Artificial Intelligence

पनीर पॉपकॉर्न रेसिपी

Daughter Quotes in Marathi मुलींसाठी सुंदर कोट्स

पुढील लेख
Show comments