Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मंगेश पाडगावकर कविता : चिऊताई दार उघड

Webdunia
रविवार, 20 मार्च 2022 (10:44 IST)
दार उघड
दार उघड चिऊताई
चिऊताई दार उघड !
 
दार असं लावून,
जगावरती कावून,
किती वेळ डोळे मिटून आत बसशील?
आपलं मन आपणच खात बसशील ?
 
वारा आत यायलाच हवा!
मोकळा श्वास घ्यायलाच हवा !
 
दार उघड,
दार उघड,
चिऊताई चिऊताई, दार उघड !
 
फुलं जशी असतात,
तसे काटेही असतात.
सरळ मार्ग असतो,
तसे फाटेही असतात !
 
गाणा-या मैना असतात.
पांढरे शुभ्र बगळे असतात.
कधी कधी कर्कश्य काळे
कावळेच फ़क्त सगळे असतात .
 
कावळ्याचे डावपेच पक्के असतील.
त्याचे तुझ्या घरट्याला धक्के बसतील .
 
तरीसुद्धा या जगात वावरावंच लागतं.
आपलं मन आपल्यालाच सावरावं लागतं .
 
दार उघड
दार उघड चिऊताई,
चिऊताई दार उघड !
 
सगळंच कसं होणार
आपल्या मनासारखं?
आपलं सुद्धा आपल्याला
होत असतं परकं !
 
मोर धुंद नाचतो म्हणून
आपण का सुन्न व्हायचं?
कोकीळ सुंदर गातो म्हणून
आपण का खिन्न व्हायचं ?
 
तुलना करित बसायचं नसतं गं
प्रत्येकाचं वेगळेपण असतं गं !
 
प्रत्येकाच्या आत
फुलणारं फूल असतं.
प्रत्येकाच्या आत
खेळणारं मूल असतं !
 
फुलणा-या फुलासाठी,
खेळणा-या मुलासाठी ,
 
दार उघड
दार उघड चिऊताई
चिऊताई दार उघड !
 
निराशेच्या पोकळीमध्ये
काहीसुद्धा घडत नाही.
आपलं दार बंद म्हणून
कुणाचंच अडत नाही !
 
आपणच आपला मग
द्वेष करू लागतो
आपल्याच अंधाराने
आपलं मन भरू लागतो
 
पहाटेच्या रंगात तुझं घरटं न्हालं.
तुला शोधित फुलपाखरु नाचत आलं .
 
चिऊताई चिऊताई
तुला काहीच कळलं नाही .
 
तुझं दार बंद होतं.
डोळे असून अंध होतं .
 
बंद घरात बसून कसं चालेल?
जगावरती रुसून कसं चालेल ?
 
दार उघड
दार उघड चिऊताई
चिऊताई दार उघड ! 
 
– मंगेश पाडगावकर

संबंधित माहिती

आई-बाबांना पत्र लिहून मतदान करण्यासाठी साद घालण्याचा विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम

श्रीकांत शिंदेंना उमेदवारी मिळण्याबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले-

मोदींचा 3.0 प्लॅन : वृद्धांची पेन्शन वाढणार!

RR vs RCB : आज राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात सामना, प्लेइंग 11 जाणून घ्या

बोलेरो दुचाकीची धडक होऊन अपघातात पाच जण जागीच ठार

Career in Master of Applied Management : मास्टर ऑफ अप्लाइड मॅनेजमेंट मध्ये करिअर करा

दररोज 10 हजार पावले चाला, या 10 गंभीर आजारांपासून वाचा

बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर बनून करिअर करा, पात्रता जाणून घ्या

चेहऱ्याचे स्क्रब करण्याची योग्य पद्धत, करू नका या पाच चुका

लघवीचा रंग रोगांची लक्षणे आधीच सांगतो, रंग असा असेल तर लगेच डॉक्टरकडे जा

पुढील लेख
Show comments