Dharma Sangrah

मराठीही फारशी सोपी नाही..

Webdunia
बुधवार, 8 डिसेंबर 2021 (12:27 IST)
१. म्हणे " शिरा " खाल्ल्याने  " शिरा " आखडतात.
२. " काढा " पिऊन मग एक झोप " काढा ".
३. " हार " झाली की " हार " मिळत नाही. 
४. एक " खार " सारखी घरात येऊन नासधूस करते म्हणून तो तिच्यावर " खार " खाऊन आहे.
५. " पळ " भर थांब, मग पळायचे तिथे " पळ ".
६. " पालक " सभेत शिक्षकांनी पाल्यांच्या आहारात  मेथी, " पालक " इ. पालेभाज्या ठेवण्याचा सल्ला दिला.
७. " दर " वर्षी काय रे " दर " वाढवता..??
८. " भाव " खाऊ नकोस, खराखरा " भाव " बोल.
९. नारळाचा " चव " पिळून घेतला तर त्याला काही " चव " राहत नाही.
१०. त्याने " सही " ची अगदी " सही सही " नक्कल केली.
११. " वर " पक्षाची खोली " वर " आहे.
१२. खोबर्‍यातला मुलांचा " वाटा " देऊन मग बाकीच्याची चटणी " वाटा ".
१३. " विधान " सभेतील मंत्र्यांचे " विधान " चांगलेच गाजले.
१४. फाटलेला शर्ट " शिवत " नाही तोपर्यंत मी त्याला " शिवत " नाही.
१५. भटजी म्हणाले, " करा " हातात घेऊन विधी सुरू " करा ".
१६. धार्मिक " विधी " करायला कोणताही " विधी " निषेध नसावा.
१७. अभियंता  म्हणाला, इथे "बांध  बांध"
१८. उधळलेला " वळू " थबकला, मनात म्हणाला, इकडे " वळू " कि तिकडे " वळू ".
१९. कामासाठी भिजवलेली " वाळू " उन्हाने " वाळू " लागली.
२०. दरवर्षी नवा प्राणी " पाळत " निसर्गाशी बांधिलकी " पाळत " असतो.
२१. फुलांच्या " माळा " केसांत " माळा ".
 
मराठीची अवखळ वळणे....
ज्यांना तोंडावर "बोलून टाकणं" जमत नाही ते पाठीमागे "टाकून बोलत" राहतात. 
शहाणा माणूस "पाहून हसतो", निर्मळ माणूस "हसून पाहतो".
काम सोपं असेल तर ते आपण "करून पाहतो", अवघड असेल तर "पाहून करतो"
एकजण "लिहून बघतो" तर दुसरा "बघून लिहितो"
ही अशी सुंदर, लवचीक, अवखळ मराठी
 
आता हेच बघा ना,
एखाद्याचा सत्कार करताना आपण देतो श्रीफळ, तर हकालपट्टी करताना देतो नारळ!!
 
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
 
 
- सोशल मीडिया

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

ही लक्षणे शरीरात पोषणाची कमतरता दर्शवतात, दुर्लक्ष करू नका

बरगड्यांच्या वेदनांकडे दुर्लक्ष करू नका, या योगासनांचा सराव करा

नैतिक कथा : समुद्र आणि कावळ्यांची गोष्ट

Baby girl names inspired by Lord Rama प्रभू श्रीराम यांच्या नावावरुन मुलींची नावे

ख्रिसमस स्पेशल साधी सोपी कप केक रेसिपी

पुढील लेख
Show comments