Marathi Biodata Maker

Marathi Kavita : चांदण्या सारखी फुलायची चमेली दारी

Webdunia
शुक्रवार, 16 जुलै 2021 (18:17 IST)
चांदण्या सारखी फुलायची चमेली दारी,
सुगन्ध च सुगन्ध पसरे आमच्या घरी!
पारिजात ही पाडे सडा फुलांचा,
देऊन टाकणं हाच मूळ स्वभाव त्याचा,
जास्वदं ही फुले भरभरून, लाल लालचटूक,
वाहता त्यास "श्री"शिरावर, शोभून दिसे मस्तक,
रंगबिरंगी शेवंती चा होता थाटमाट,
मंद मंद सुवास पसरे, नुसता घमघमाट!
अबोली आपली कोपऱ्यात उभी असें,
कुंद कळ्यांची नेहमीच तिची मैत्री असे,
येता चैत्र येतसें बहर मोगऱ्यास फार,
मोहून घेई चित्ता सुगन्ध, पसरे चौफेर ,
असें छोटे मोठे फुलझाडं होते अंगणी माहेरी,
सुगंध त्याचा घेऊन ओच्यात,आले मी सासरी!
...अश्विनी थत्ते

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

सर्व पहा

नवीन

घाणेरडे पाणी कसे स्वच्छ करावे, जाणून घ्या ५ योग्य पद्धती

कंडोमनंतर आता गोळी, YCT-529 पुरुषांसाठी पहिली गर्भनिरोधक टॅबलेट

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात पेरू खाण्याचे हे दोन फायदे ऐकून हैराण व्हाल, आजपासून दररोज खाण्यास सुरुवात कराल

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

पुढील लेख
Show comments