Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Same pinch बाप सूरवात करतो ३०० रुपये महिना...

Same pinch बाप सूरवात करतो ३०० रुपये महिना...
, शुक्रवार, 17 डिसेंबर 2021 (15:41 IST)
बाप सूरवात करतो ३०० रुपये महिना. 
मुलगा सूरवात करतो ३०००० रुपये महिना..
संसारात पडल्यावर दोघांचा जमाखर्च सारखाच असतो..
मुलगा बापाला चिमटा घेत same pinch म्हणतो..
 
तसे रोज संध्याकाळी ते सगळे पोळी भाजी वरण भातच खातात अजूनही..
सासू एखाद्या रविवारी हट्ट करून उडपीची इडली आणि मंगला थिएटर ला dream girl बघायला जाऊ म्हणायची..
सून आता एखाद्या रविवारी dominos pizza खाऊ आणि pvr ला dream girl बघायला जाऊ म्हणते..
दोन "dream girl" मध्ये फरक असला तरी सासू सुनेचे ड्रीम साधारण सारखेच असते..
सून सासूला चिमटा घेत same pinch म्हणते..
 
दुसऱ्या शहरात नोकरी लागते. घर घ्यायची वेळ येते..
मुलगा Home loan ची चौकशी करतो..
हप्ते बापाने ही फेडले.. हफ्ते मुलगा ही सुरू करतो..
सून FD RD मोडते.. दागिने समोर ठेवते..
अजून एका छपराला त्यांचे आडनाव मिळते..
सासू ३० वर्षांपूर्वीचे पिठाच्या डब्यात लपवलेले पैसे दागिने आठवते..
सासू सुनेला चिमटा घेत same pinch म्हणते..
 
बजाज स्कूटर साठी चार खेटे घालतो..
थोडे पैसे साठवतो.. थोडे कर्ज घेतो..
मुलाने नवीन कारसाठी car loan ची चौकशी केल्यावर बाप तोच दिवस आठवतो..
बाप मुलाला चिमटा घेत same pinch म्हणतो..
नवऱ्याने चिंतामणी रंगाची कांजीवरम आणि नाग वाकी हेरून ठेवलेली असते बायको साठी.. 
कधीतरी शिल्लक पडल्यावर घ्यायला..
दुसऱ्या नवऱ्याने बदामी रंगाचा one piece आणि हिर्याचे पेंडेंट बघितलेले असते बायकोसाठी.. 
कधीतरी शिल्लक पडल्यावर घ्यायला..
पण या पाडव्याच्या ओवाळणीत मात्र तो बंद पाकीट च ठेवतो..
एक नवरा दुसऱ्या नवऱ्याला same pinch म्हणतो..
 
फार काही बदलले नाही.. तेव्हाही आणि आत्ताही..
अजूनही जमाखर्च मांडताना महिना अखेर येतेच..
तरीही अजूनही महिना अखेरीला kitchen भरलेले असतेच..
अजूनही कपाटात खाली लपवलेले पाकीट जड असतेच..
काटकसरीच्या मडक्यातून अजूनही बचत झिरपते..
अजूनही बापाला मुलाने गुणल्या नंतर उत्तर चौकोनी कुटुंब हेच येते..
एक पिढी दुसऱ्या पिढीला same pinch म्हणते..
 
- सोशल मीडिया

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Chanakya Niti: तोंडावर गोड आणि पाठीमागील वाईट बोलणारे विनाशाचे कारण बनू शकते, अशा लोकांपासून सावध रहा