Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 10 April 2025
webdunia

असावी मर्यादेत गोष्ट प्रत्येकच

marathi poem
, बुधवार, 20 जानेवारी 2021 (16:15 IST)
असावी मर्यादेत गोष्ट प्रत्येकच,
संयम हा जीवनात आवश्यकच,
गोष्टी सगळ्या भरकटत जातील,
दिशाहीन होऊन सर्वच पांगतील,
कुठंतरी असावा अंकुश ह्यावर,
मनाला घालावा प्रत्येकानं आवर,
ठेवावं न स्वप्न उराशी बाळगून !
पण किंमत काय मोजतोय हे उमगून!
आपल्या स्वप्न पुर्ती साठी खांदा दुसऱ्याचा का?
आनंद आपला होतो, बळी इतरांचा असावा का?
नकोच असं सुख ही यायला वाटेला,
संयम, अन मर्यादा हवीच बाळगता यायला.!
....अश्विनी थत्ते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सुरकुत्या दूर करण्यासाठी केवळ 4 स्टेप्स