rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कितीतरी गोष्टी शेवटी सावरून घ्याव्याच लागतात

marathi poem
, मंगळवार, 4 जानेवारी 2022 (14:59 IST)
कितीतरी गोष्टी शेवटी सावरून घ्याव्याच लागतात,
आपलं माणूस चुकतो, जाणीवही असते, पण दुसऱ्या समोर, चुका दाखवायच्या नसतात,
कितीतरी गोष्टी शेवटी सावरून घ्याव्याच लागतात,
खूप मोठा आव आणतात काही,पण पितळ उघडे पडतं, अश्या वेळी त्या झाकून न्यायच्या असतात,
कितीतरी गोष्टी शेवटी सावरून घ्याव्याच लागतात,
तिरिमिरीत काहीबाही बोलले जातं, जिव्हारी घाव बसतो,पण ऐन वेळी गोड बोलून निभवाव्या लागतात,
कितीतरी गोष्टी शेवटी सावरून न्याव्याच लागतात,
अधुर राहतं काम कुणाचं, वेळी च पूर्ण होत नाही, त्या पूर्ण भासवाव्या लागतात,
कितीतरी गोष्टी शेवटी सावरून घ्याव्याच लागतात!
जे गात राहवंच लागतच,यालाच तर जीवन गाणे म्हणतात, भूमिका सकाराव्याच लागतात,
कितीतरी गोष्टी शेवटी सावरून घ्याव्या च लागतात!!!
....अश्विनी थत्ते

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Relationship Tips: महिलांनी या सवयी सुधारल्या पाहिजेत, नातं तुटू शकत