Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Monday, 21 April 2025
webdunia

वाट रविराजाची कोणी बरं अडविली

marathi poem
, मंगळवार, 28 डिसेंबर 2021 (16:13 IST)
वाटे सारे स्तब्ध जाहले, गती जीवनाची थबकली,
किंचीत संकोचून कळी ही उमलायची थांबली,
वाट रविराजाची कोणी बरं अडविली,
रथाचे घोडे घोडदौड करीत किंचित रेंगाळली,
येतो असाही एक दिवस , वाटे सर्वच शांत,
मी ही शाल पांघरून बघतो सारे,
पण मन अशांत!
किरणे ही अडकून बसली,सुटेना गुंता,
सोडून द्यावे विधत्यावर कधी कधी,न करावी चिंता!
अश्विनी थत्ते
 
...अश्विनी थत्ते

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

New Year 2022: नवीन वर्षात जोडीदाराला हे गिफ्ट द्या, नात्यात गोडवा येईल