Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Poem on Women कारण तुच आहे आरंभ, आणि तुच आहे अंत

poem on women
Webdunia
शुक्रवार, 7 मार्च 2025 (11:59 IST)
आमच्या कडे एक लग्न पत्रिका आली,
पत्रीकेच्या पाठीमागे हा छोटासा, 
सुंदर संदेश वजा कानमंत्र लिहिता होता.
मनाला भावला म्हणून पाठवला.
 
नारी शक्त्ति महान
आम्ही करतो सन्मान
आरंभ पण मीच, आणि अंत पण मीच
सासरी जाणाऱ्या मुलीला असा कानमंत्र 
सर्व आई-वडीलांनी द्यावा
हिच बदलत्या काळाची गरज आहे
 
मतलबी जाळ्यात नवऱ्याला फसवून 
अलिप्त संसार थाटू नको, 
स्वार्थाच्या हेके खोर शस्त्राने
सासरच्या नात्यास छाटु नको. 
 
आई झाल्यावर मुली तुला
आईपणाचे भान राहु दे, 
एकत्रित कुटुंबाचे संस्कार 
तुझ्या बाळांच्या मनावर होऊ दे
      
सासुशी उडणाऱ्या खटक्यात
बाळांना उगीच ओढू नको, 
आजी नातवाच्या नात्यावर
त्याचा राग काढू नको,
 
सासऱ्याच्या म्हातारपणावर 
रागे वैतागे घसरु नको, 
नव्या-जुन्या मधील दुवा 
तुच आहे हे विसरु नको.
 
अगदी या भावासारखे
दिराबरोबर तुझे भांडण होईल.
पण तुझ्या लाडक्यांना खेळणीही
तोच काका घेउन येईल
 
लहान असो नाहीतर मोठी 
नणंद चेष्टेने त्रास देणारंच 
मांडीवर घेत तुझ्या पिलांना,
चिऊ-काऊचा घास भरवणारंच
 
तुझे-माझे भेदभावनेने 
जावेच्या पोरांचा द्वेष करु नको 
वेळ प्रसंगी तिच्या लाडक्यांना,
दोन घास जास्त देण्या मागे सरु नको
 
घरातल्या क्षुल्लक कुरबुरींना 
द्वेष पुर्ण उत्तर देऊन काय करशील? 
अगं जशास तसे उत्तर देऊन,
एक दिवस घराचे घरपण मारशील
 
नातेवाईकाना धरुन राहिली तर
सर्वाच्या मनात घर करुन रहाशील
तुझ्या पाखरांची उंच भरारी तूं
सर्वाबरोबर आनंदात पाहशिल
 
शेवटी जोडण्याचे संस्कार केले, तर
मुलांच्या मनात तुकडे होणार नाही 
आणि तुझ्या म्हातारपणाचे दिवसही, 
वृद्धाश्रमात कधीच जाणार नाहीत
 
कारण तुच आहे आरंभ,
आणि तुच आहे अंत
 
- सोशल मीडिया
ALSO READ: Women's Day Wishes in Marathi 2025 महिला दिन शुभेच्छा संदेश मराठी

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

वांग्ड्निश्चय आणि सीमांत पूजन विधी

ज्ञानेश्वरी संपूर्ण अध्याय (१ ते १८)

Holi Vastu Upay घरातील तिजोरी भरायची असेल तर होळीला करा हे 5 उपाय

काकडी खाण्याची सर्वोत्तम वेळ कोणती?जाणून घ्या

ऑफिसमध्ये चांगली छाप हवी असेल तर कामाच्या ठिकाणी या गोष्टी लक्षात ठेवा

सर्व पहा

नवीन

स्वादिष्ट कश्‍मीरी पनीर मसाला रेसिपी

Career in MBA Marketing Management : एमबीए मार्केटिंग मॅनेजमेंट कोर्स मध्ये करिअर

Women's Day ला मुंबईतील या तीन ठिकाणी नक्की भेट द्या

निरोगी आहाराने तुम्ही हृदयविकाराचा धोका कसा कमी करू शकता? उपाय जाणून घ्या

Divorce yog in Kundali कुंडलीत घटस्फोटाचे योग कधी तयार होतात, जाणून घ्या उपाय

पुढील लेख
Show comments