Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आई ...निसर्गाच असं सर्वांगसुंदर देणं

webdunia
शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2022 (18:05 IST)
आई ...निसर्गाच असं सर्वांगसुंदर देणं, 
प्रत्येकानं त्यासमोर नतमस्तक होणं,
एका जिवातून दुसऱ्या जीवाची निर्मिती,
विलक्षणच अशी ही आहे कलाकृती,
छोट्यातला छोटा जीवही त्याला अपवाद नाही,
आई नावाची जादू त्यानं अनुभवली नाही,
कधी चाटताना तिच्यातील वात्सल्य आपणास दिसते,
कधी तोंडात धरून, सुरक्षित नेण्यासाठी धडपडते,
पंखाखाली ऊब देते, कित्तीही ऊनवाऱ्यात,
निधड्या छातीनं लढते, जेव्हा शत्रू हल्ला करतात,
जाईल जरी पोटाच्या भुकेसाठी  ती कुठवर, 
परी नजर तिची असते फक्त घरट्यावर,
असमर्थता कधीच दिसत नाही तिच्यात ,
सदैव दक्ष असते ती तिच्या प्रपंचात,
आशा या विलक्षण आई साठी, शब्द ही अपुरे,
वर्णन तिचं शब्दातीत,तिच्या विन जग ही अधुरे !
....अश्विनी थत्ते

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Constitution Day 2022 संविधान दिन कधी आणि का साजरा केला जातो?