Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अजून उजाडत नाही गं, नाही गं

Webdunia
बुधवार, 2 जून 2021 (17:04 IST)
दशकांमागुन सरली दशके
अन् शतकांच्या गाथा गं,
ना वाटांचा मोह सुटे, वा
ना मोहाच्या वाटा गं,
पथ चकव्याचा गोल सरळ वा
कुणास उमगत नाही गं,
प्रवास कसला फरफट अवघी,
पान जळातुन वाही गं॥
 
कधी वाटते दिवस-रात्र हे
नसते काही असले गं,
त्यांच्या लेखी रात्र सदाची
ज्यांचे डोळे मिटले गं,
स्पर्श आंधळे, गंध आंधळे
भवताली वनराई गं,
तमातली भेसूर शांतता
कानी कुजन नाही गं॥
 
एकच पळभर एखादी कळ
अशी सणाणून जाते गं,
क्षणात विरती अवघे पडदे
लख्ख काही चमचमते गं,
ती कळ सरते, हुरहुर उरते,
अन् पिकण्याची घाई गं,
वर वर सारे शिंपण काही
आतून उमलत नाही गं॥
 
– संदिप खरे
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

Dinner Special : पंजाबी छोले रेसिपी

Food to Reduce Cholesterol कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी रिकाम्या पोटी काय खावे

मसूर फ्राइड डाळ रेसिपी

तुमचा ब्रश आजारांना आमंत्रण देत आहे का?

Beauty Tips : कोको पावडर फेसपॅकने चेहरा होईल चमकदार

पुढील लेख
Show comments