Dharma Sangrah

स्वप्नावर आली ओल

Webdunia
शुक्रवार, 2 जुलै 2021 (16:23 IST)
स्वप्नावर आली ओल
उन्हाची भूल
कोसळे रावां….
 
चिमटीत पिळावा जीव
तशी घे धाव 
हवेतिल वणवा….
 
गावांचे चाहुलतंत्र
उन्हाळी मंत्र
भारतो जोगी…
 
कवटीत मालवी दीप
स्मृतींचे पाप
लावितो आगी..
 
हिरकणीस ठेचुन जाळ,
पेटवी माळ
पांगळा वैरी….
 
घाटात हरवली गाय
कापतो काय
कसाई लहरी….
 
जेथून मृगजळी धार
उन्मळे फार
दिठींची माया…
 
घारींनी धुतले पंख
भव्य नि:शंक
सूर्य सजवाया…..
 
शपथेवर सांगुन टाक
कोणती हाक
कोणत्या रानी,
 
झाडीत दडे देऊळ
येतसे गडे
जिथून मुल्तानी….
 
मुद्रेवर कोरुन डंक
खुपस तू शंख
हृदयदीप्तीने
 
गणगोत काढता माग
मला तू माग
तुझी जयरत्ने….
 
पक्ष्याविण रुसले झाड
नदीच्या पाड
पृथ्वीचे रंग…
 
मिथिलाच उचलते जनक
पेटता कनक
भूमिचे बंध….
 
ग्रेस
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

गरम, खारट आणि अल्कधर्मी, लाल पाणी असलेले टांझानियाचे रहस्यमय सरोवर

Mango Rabdi Faluda Recipe घरी अगदी सहजपणे बनवता येतो मँगो रबडी फालुदा; नक्कीच ट्राय करा

The National Panchayati Raj Day 2026 :भारतात पंचायती राज दिवस कधी आणि का साजरा केला जातो?

ऑफिसच्या धावपळीत सहज खाता येतील आणि दुपारी सुद्धा ताजे वाटतील असे ३ खास पदार्थ

दररोज दोन केळी खाण्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या

पुढील लेख
Show comments