Festival Posters

दत्तो वामन पोतदार

वेबदुनिया
WD
महाराष्ट्राच्या इतिहासाविषयी चालू शतकातील चालता-बोलता ज्ञानकोश म्हणजे दत्तो वामन पोतदार! आज त्यांच्या जन्मदिन. 5 ऑगस्ट 1890 रोजी महाडजवळील बीरवाडी येथे त्यांचा जन्म झाला. मराठी, हिंदी, संस्कृत, उर्दू आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असलेल्या पोतदारांनी मराठ्यांच्या इतिहासालाच आपले जीवनसर्वस्व मानले होते. भारत इतिहास संशोधन मंडळ, मराठी साहित्य परिषद, शिक्षण प्रसारक मंडळी, राष्ट्रभाषा प्रचार समिती अशा अनेक संस्थांशी ते संबंधित होते.

मराठ्यांच्या इतिहासाचा अभ्यास, संशोधन आणि व्यासंग याला वाहून घेतलेल्या पोतदारांनी ‘मराठी गद्याचा इंग्रजी अवतार’,‘विविध दर्शन’, ‘मी युरोपात काय पाहिले’,‘शिवचरित्राचे पैलू’ यांसारखे ग्रंथ लिहिले. हिंदी साहित्य संमेलनाने त्यांना ‘साहित्य वाचस्पती’ ही पदवी दिली, तर केंद्र शासनाने ‘महामहोपाध्याय’ या पदवीने गौरविले. 1933 ते 36 या काळात ‘महाराष्ट्र साहित्य पत्रिके’चे संपादन करणारे पोतदार 1939 मध्ये अहमदनगर येथील मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ आणि पुणे विद्यापीठाचे ते कुलगुरू होते. 6 ऑक्टोबर 1979 रोजी ते अनंतात विलीन झाले.
सर्व पहा

नक्की वाचा

Mithun Varshik Rashi Bhavishya 2026 in Marathi मिथुन राशी २०२६ राशीभविष्य

काळा रंग अशुभ मानतात मग मंगळसूत्रांमध्ये काळे मणी का असतात? ज्योतिषशास्त्रीय महत्त्व काय?

Nanad Bhavjay Relationship नणंद- वहिनी यांच्यातील नाते कमकुवत करतात या चुका

पूजेत उदबत्ती जाळणे अशुभ ? शास्त्र काय म्हणतात ते जाणून घ्या

Datta Jayanti 2025 दत्त जयंती कधी? दत्ताचा जन्मोत्सव साजरा करण्याची पद्धत आणि महत्त्व जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

Papaya Halwa हिवाळयात बनवा पौष्टिक अशी पाककृती कच्च्या पपईचा हलवा

छोट्या छोट्या गोष्टींवरून भावनिक या हार्मोन्सच्या कमीमुळे होतात

डिप्लोमा इन डर्मेटोलॉजी मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

चमकदार त्वचेसाठी गुलाबाच्या पानांचा वापर करून गुलाबजल तयार करा

हिवाळ्यात उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी या पदार्थांचा समावेश करा

Show comments