Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्य शासनाच्या विविध वाड्मय पुरस्कारांची घोषणा

Webdunia
शुक्रवार, 28 ऑक्टोबर 2016 (17:09 IST)
राज्य शासनाच्या विविध वाड्मय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. पुरस्काराचे स्वरूप जास्तीत जास्त एक लाख रुपये आणि कमीत कमी ५0 हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे आहे. 
 
पुरस्कार, त्याचे विजेते आणि त्यांच्या साहित्यकृती खालीलप्रमाणे :  प्रौढ वाड्.मय ( काव्य) ; कवि केशवसूत पुरस्कार - प्रभा गणोरकर (व्यामोह), प्रथम प्रकाशन (काव्य); बहिणाबाई चौधरी पुरस्कार - इग्नेशिअस डायस (अधांतराला लटकलेल्या आवरणात), नाटक ; राम गणेश गडकरी पुरस्कार - रमेश नाईक (ती एक अहिल्या होती), कादंबरी; हरी नारायण आपटे पुरस्कार - बा.भो.शास्री (झांजर), प्रथम प्रकाशन कादंबरी; श्री.ना.पेंडसे पुरस्कार - नितीन थोरात (सूर्याची सावली), लघुकथा; दिवाकर कृष्ण पुरस्कार - प्रकाश बाळ जोशी (प्रकाश बाळ जोशी यांच्या कथा), प्रथम प्रकाशन लघुकथा; ग.ल.ठोकळ पुरस्कार - ऋषिकेश वांगीकर (कथास्तु), ललितगद्य; अनंत काणे पुरस्कार - प्रेमानंद गज्वी (सगुण नगुण), प्रथम पुरस्कार ललितगद्य; ताराबाई शिंदे पुरस्कार - संदेश कुलकर्णी (माँटुकल दिवस).
 
विनोद; श्रीपाद कृष्ण कोल्हटकर पुरस्कार - प्रतिमा इंगोले (हॅट्ट्रिक), चरित्र; न.चिं.केळकर पुरस्कार - सुहास बहुलकर (आयुष्याची मौल्यवान माती : शिल्पकार करमरकर, आत्मचरित्र; लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार - डॉ.ऊज्‍जवला सहाणे (प्रेरणा द साऊंड ऑफ सायलेन्स..), समीक्षा/ वाड्.मयीन संशोधन/ सौंदर्यशास्र; श्री.के.क्षीरसागर पुरस्कार - सुधीर रसाळ (मर्ढेकरांची कविता : आकलन आणि वेिषण), समीक्षा सौंदर्यशास्र; रा.भा.पाटणकर पुरस्कार - राजेंद्र सलालकर (रंगनाथ पठारे यांच्या साहित्यातील स्री दर्शन), राज्यशास्र/समाजशास्र; डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार - रमेश पतंगे (सामाजिक न्याय आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर), इतिहास; शाहू महाराज पुरस्कार - संजीवनी खेर (सर्वसाक्षी), भाषाशास्र/ व्याकरण; नरहर कुरुंदकर पुरस्कार - रामदास भटकळ, मृदुला प्रभुराम जोशी (पॉप्युलर रीतिपुस्तक), विज्ञान व तंत्रज्ञान; महात्मा जोतिराव फुले पुरस्कार - रमेश वरखेडे (सायबर-संस्कृती), शेती व शेतीविषयकपूरक व्यवसाय लेखनासह; वसंतराव नाईक पुरस्कार - डॉ. नितीन मार्कण्डेय (सातत्यपूर्ण आणि भरपूर दुधासाठी माज संकलन तंत्र).
 
अर्थशास्त्र व अर्थशास्त्रविषयक लेखन : सी. डी. देशमुख पुरस्कार- डॉ. श्रीराम पेडगावकर (मानवी अर्थशास्र), तत्त्वज्ञान व मानसशास्र; ना.गो.नांदपूरकर पुरस्कार - दिलीप धोंडगे (तात्पर्य), शिक्षणशास्र; कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार- हेरंब कुलकर्णी (जे.कृष्णमूर्ती आणि कृष्णमूर्ती स्कूल्स), पर्यावरण; डॉ.पंजाबराव देशमुख पुरस्कार- बी. के. कुलकर्णी (पर्यावरण), संपादित/आधारित रा.ना.चव्हाण पुरस्कार - द.दि.पुंडे (शताब्दी आवृत्ती गावगाडा), अनुवाद; तर्कतीर्थ लक्ष्मणशास्री जोशी पुरस्कार - अश्‍विनी भिडे-देशपांडे (मादाम क्युरी), संकीर्ण (क्रीडासह); भाई माधवराव बागल पुरस्कार - डॉ.गिरीश जाखोटिया (डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि एकविसावे शतक), बाल वाड्.मय कविता; बालकवी पुरस्कार - ज्ञानदा आसोलकर (पाऊस माझा साथीदार), बालवाड्.मय कादंबरी; साने पुरुजी पुरस्कार - डॉ.भारती सुदामे (खजिन्याची विहीर), बाल वाड्.मय कथा; राजा मंगळवेढेकर पुरस्कार - डॉ.सुमन नवलकर (वजनदार),बाल वाड्.मय सर्वसामान्य ज्ञान (छंद व शास्रे); यदुनाथ थत्ते पुरस्कार - राजीव तांबे (गंमत शाळा भाग ३), बाल वाड्मय (संकीर्ण); ना. धो. ताह्मणकर पुरस्कार - मधुकर धर्मापुरीकर (अनकॉमन मॅन आर.के.लक्ष्मण), सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कार (सयाजी महाराज गायकवाड पुरस्कार) 'अनंत-तनया' डॉ.माणिक बंगेरी (भर्तृहरी ते अव्वैय्यार - सारे एकाच तत्त्वाचे धनी)

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

Career in Master of Applied Management : मास्टर ऑफ अप्लाइड मॅनेजमेंट मध्ये करिअर करा

अचानक ब्लड प्रेशर वाढल्यास हा योगाभ्यास करणे

चविष्ट आलू जलेबी

Bra Wearing Benefits रोज ब्रा घालण्याचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर बनून करिअर करा, पात्रता जाणून घ्या

पुढील लेख
Show comments