भोपाळला पोहचल्याबरोबर ताज-उल-मशिदीचे दर्शन घडते. जामा मशीद नावानेच ही मशीद प्रसिद्ध आहे. आशियातील सर्वांत मोठी मशीद (आकाराच्या दृष्टीने) म्हणूनही तिची प्रसिद्धी आहे. मशिदीच्या प्रांगणात प्रवेश केल्याबरोबर एक वेगळाच पवित्र अनुभव येतो. मुख्य दरवाजातून आत गेल्यास मशिदीच्या मुख्य दिवाणखान्यात पोहोचतो.
मशिदीच्या प्रांगणात भले मोठे कुंड असून त्यात मुख्य दिवाणखान्याचे मनोहर प्रतिबिंब पडते. मुख्य दिवाणखान्यात भाविक नमाज पढतात.. दिवाणखान्यास लागूनच सुंदर मदरसा आहे.
गुलाबी दगडात बांधलेल्या मशिदी स
WD
WD
पांढरे घुमट असून मुस्लिम स्थापत्यकलेचा हा उत्कृष्ट नमुना आहे. भाविकांच्या मते ही पवित्र मशिद त्यांना मानवतेच्या मार्गावर चालण्यासाठी प्रेरीत करते. भोपाळच्या कलाकारांनीच मशिदीचे बांधकाम केले असल्याने भारतीय व इस्मामिक स्थापत्यकलेचा सुंदर मिलाफ झाला आहे. मशिदीच्या भिंतीवर आकर्षक फुले कोरण्यात आली आहेत.
मुस्लिम राजा शहाजहानची पत्नी कुदीसा बेगम यांनी मशिदीची निर्मिती केल्याचे मानण्यात येते. ईदच्या मंगल व पवित्र सणाच्या काळात मशिदीच्या पावित्र्यात व सौदर्यात आणखी भर पडते. ईदचा नजाज पढताना हजारो भाविकांचे डोके येथे टेकते. सर्व जाती जमातींच्या लोकांना येथे मुक्त प्रवेश आहे.
WD
WD
कुतुबखाना - मशिदीत ग्रंथालय असून उर्दू साहित्याचा अनमोल साठा येथे जतन करण्यात आला आहे. येथे सोन्याच्या शाहीने लिहिलेले कुराण आहे. आलमगीर औरंगजेबाने या ग्रंथाची रचना केल्याचे सांगितले जाते. उर्दू साहित्य व मासिकांनी हे ग्रंथालय समृद्ध आहे. शिवाय उर्दू भाषेतील जगभरात प्रसिद्ध होणार्या मासिकांचाही येथे संग्रह आहे. यामध्ये काही दुर्मिळ मासिकेही आहेत.
इज्तिमा : साठ वर्षापासून येथे प्रत्येक वर्षी इज्तिमा सोहळा भरवण्यात येतो. जगभरातील भाविक यावेळी हजेरी लावतात. पूर्वी मशिदीतच इज्तिमा भरत होता, मात्र भाविकांच्या संख्येतील वाढ लक्षात घेता इज्तिमा दुसर्या ठिकाणी भरविण्यात येत आहे.
कसे पोहचाल: मध्यप्रदेशची राजधानी भोपाळला पोहचणे सुलभ आहे. दिल्ली, मुंबई, ग्वाल्हेर व इंदूरहून येथे पोहचण्यासाठी नियमित विमानसेवा उपलब्ध आहे. रेल्वेने जायचे झाल्यास चेन्नई-दिल्ली रेल्वे मार्गावर भोपाळ येत असल्याने सहज पोहचता येते. दिल्लीहून इटारसी व झाशी मार्गे भोपाळसाठी रेल्वेसेवा उपलब्ध आहे. बसने जाण्यासांठी इंदूर येथून येथे बससेवा उपलब्ध आहे. मांडू, पचमढी, खजुराओ, ग्वाल्हेर, सांची, जबलपूर व शिवपूरी येथुनही बससेवा उपलब्ध आहे.