Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

त्यागराज स्वामींची समाधी

अय्यनाथन्
WD
कर्नाटिक संगीतातील महान व्यक्तिमत्व म्हणजे त्यागराज. श्रीरामावर अतीव श्रद्दा असणार्‍या त्यागराजांनी त्यावर २४ हजार अभंग रचून गायले. हे अभंग आज तमिळनाडूत घराघरात म्हटले जातात. दरवर्षी पुष्प पंचमीच्या शुभ दिनी थिरूवायरू येथे श्रीरामाचा महिमा सांगणारे पंचरत्‍न कीर्तन होते. त्यासाठी कर्नाटिक संगीतातील बडे बडे संगीतकार आवर्जून येतात. पाच दिवस चालणार्‍या या उत्सवात त्यागराज चरणी आपली सेवा रुजू करतात.

कावेरी नदीच्या किनारी त्यागराज यांची समाधी आहे. त्यांना 'त्यागब्रम् ह' या नावानेही संबोधण्यात येते. त्यागराज यांनी याच ठिकाणी श्रीरामाचे २४ हजार अभंग गायले. आणि त्याची कृपा प्राप्त करून घेतली. त्यागराज यांची भजने गाणे हे श्रीरामची पूजा करण्याच्या समान मानले जाते. म्हणूनच चेन्नईमध्ये होणार्‍या कोणत्याही कर्नाटिक संगीत महोत्सवात त्यांची 3 ते 4 तरी भजने आवर्जून गायली जातात.

WD
कावेर ी, कुदमूर्त ी, वेन्नर ू, वेट्टरू व वडावरू अशा पाच नद्या असलेल्या तिरूवइयरू या पावन स्थळी त्यागराज यांनी काही वर्ष वास्तव्य केले आहे. त्यागराज यांचा जन्म 6 जानेवार ी, 1767 रोजी तिरूवरूर येथे झाला. त्यांनी कर्नाटिक संगीताचा विकास केला आणि त्याला श्रीरामाचा भक्तीमार्ग बनविले. त्यामुळे त्यांना एकदा तंजावरच्या राजाने दिलेला प्रस्ताव नाकारला होता. त्याचा त्यांच्या भावाला राग येऊन त्याने श्रीराम मूर्ती फेकून दिली होती. त्यागराज त्याच मूर्तीची पूजाअर्चा करीत होते. त्यानंतर ते तीर्थयात्रेला निघाले व दक्षिण भारतात भ्रमण करत असताना त्यांनी श्रीराम महिमा सांगणारे अभंग गायले.

त्यानंतर त्यांनी तिरूवइयरू येथे निवास केला. तेथे एकदा त्यांना आंघोळ करताना नदीत कास्याची एक श्रीराम मूर्ती सापडली. ते त्याच मूर्तीची पूजा करत होते. त्यासोबत ते सीता व लक्ष्मणचीही पूजा करत होते. श्रीराम भक्त हनुमानाच्या मूर्तीजवळ बसून त्यांनी श्रीरामाचा महिमा सांगणारी भजने गायली. त्यांनी म्हटलेल्या पाच अभंगांना कर्नाटिक संगीतात सर्वोच्च स्थान आहे.

WD
त्यागराज 80 वर्षी परेश्वराच्या चरणी विलीन झाले होते. ज्या जागी त्यांनी प्राण सोडले त्या जागी एक श्रीराम मंदिर आहे. त्यात त्यागराज पूजा करत असलेल्या श्रीरा म, सीता व लक्ष्मण यांच्या मूर्ती स्थापन करण्यात आल्या आहेत. या मंदिराच्या भिंतीवर त्यांनी गायलेले अभंग लिहिले आहेत.

कसे पोहचाल ?

रेल्वे मार्ग: तंजावर येथे चेन्नईहून येण्यासाठी भरपूर रेल्वे आहेत. तंजावरपासून तिरुवइयरू जवळच आहे.

रस्ता मार्ग: चेन्नईहून तंजावरसाठी भरपूर बस आहेत. तेथून तिरुवइयरूसाठी सहज बस उपलब्ध होते.

हवाईमार्ग: त्रिची जवळचा विमानतळ आहे. तेथून एक-दीड तासात तिरुवइयरू येथे पोहचता येते.

Surya Arghya on Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याला अर्घ्य कसे द्यावे, योग्य पद्धत आणि नियम जाणून घ्या

मुंज मंगलाष्टके

Maha Kumbh 2025: महाकुंभ मेळ्यात जाणे शक्य नसेल तर घरी शाही स्नान कसे करायचे जाणून घ्या

जिवंत मुलीसाठी करणार पिंडदान; दाम्पत्याने महाकुंभात कन्येचे दान केले, साध्वी होणार

ऋण मुक्तीसाठी ऋणमोचन अङ्गारकस्तोत्रम्

Birthday Wishes For Mother In Law In Marathi सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

HMPV Virus: तो कसा पसरतो, लक्षणे आणि खबरदारी, ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस बद्दल तपशीलवार माहिती वाचा

HMPV व्हायरस काय आहे? ज्यामुळे लोक त्याला बळी पडत आहेत, जाणून घ्या

Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही या वस्तूंचे दान करू नये?

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचे मराठी सणवार

Show comments