Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्री महावीरजी जैन मंदिर

श्रुति अग्रवाल
ShrutiWD
जैन धर्मियांच्या श्रद्धेचे प्रमुख केंद्र असलेले महावीर स्वामींचे जैन मंदिर राजस्थानमधील कटाला येथे आहे. श्री महावीर पर्व चैत्र शुक्ल एकादशीच्या दिवशी सुरू होऊन वैशाख कृष्ण (मार्च-एप्रिल) महिन्यापर्यंत सुरू असते. या काळात येथे उत्सवाचे वातावरण असते. जैन धर्मियांचे चोवीसावे तीर्थकर श्री महावीर स्वामींच्या स्मरणार्थ हे पर्व साजरे केले जाते.

या ठिकाणी एका चांभार जातीतील व्यक्तीने महावीरांची मूर्ती कोरली होते, असे सांगितले जाते.

देवाचा टिळा या नावानेही तिला ओळखले जाते. या
ShrutiWD
मंदिरासमोर संगमरवरी दगडाने बनविलेला एक स्तंभही आहे. जैन धर्मियांमध्ये हे मंदिर अतिशय पवित्र मानले जाते. गंभीर नदीकिनारी वसलेले हे मंदिर वर्धमान महावीर यांच्या स्मरणार्थ बांधण्यात आले.

या मंदिराच्या निर्मितीमागेही एक कथा आहे. शेकडो वर्षांपूर्वी एक गाय रोज सकाळी गवत खायला जात असे व संध्याकाळी मालकाच्या घऱी परतत असे. पण काही दिवासंपासून तिचे दूध आटायला लागले. मालक हैराण झाला.

ShrutiWD
असे का होते हे जाणून घेण्यासाठी एके दिवशी त्याने गायीच्या मागे जायचे ठऱवले. त्याच्या असे लक्षात आले की एका विशिष्ठ ठिकाणी गायीचे दूध आपोआप गळत असे. काही दिवसांनी त्याने त्या जागी खोदायला सुरवात केली.

तेव्हा तेथे त्याला भगवान महावीरांची मूर्ती सापडली. त्याने तेथेच त्या मूर्तीची स्थापना केली. गंभीर नदीच्या किनारी असलेले हे मंदिर २४ व्या तीर्थकराप्रती समर्पित आहे. हे मंदिर प्राचीन व आधुनिक जैन वास्तुकला आणि समकालीन कलेचे अनुपम संगम असलेले आहे.

प्राचीन जैन कला शैलीतील मंदिरांपेक्षा ते वेगळेही आहे. हे मंदिर पांढऱ्या आणि लाल दगडांनी बनलेले आहे. त्याच्या चारही बाजूला छत्री आहेत. जैन धर्मातील एक तीर्थकर प्रभू शांतीनाथ यांची ३२ फूट उंचीची मूर्ती हेही या मंदिराचे वैशिष्ट्य आहे.

येथे विशाल स्तंभावर महावीरजींच्या पादुकाही
ShrutiWD
चिन्हांकित स्वरूपात आहेत. मंदिराचे व्यवस्थापन सध्या मुख्य पुजारी भट्टारक यांच्याकडे आहे. अन्य ब्रह्मचारी त्यांना यात मदत करतात. सकाळी लवकर महावीरजींच्या मूर्तीला स्नान घातले जाते. त्यानंतर तांदूळ, पांढरी आणि पिवळी फुले, चंदन, कापूर आणि सुकामेवा अर्पण केला जातो. त्यानंतर तूपाचे दिवे प्रज्वलित करून आरती केली जाते.

ShrutiWD
या पर्वात रथयात्रा हे मुख्य आकर्षण असते. वैशाख कृष्ण द्वितीयेला तर या आनंदपर्वाचा कळस असतो. गंभीर नदीच्या किनाऱ्यावर वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येते.
हा सुवर्णरथ बैलांद्वारे ओढला जातो. महावीरजींच्या मूर्तीवर चार व्यक्ती चामरे ढाळतात. आसमंत भजन आणि महावीर स्वामींच्या जयघोषाने दुमदुमून गेलेला असतो.

यानंतर मूर्तीला वाजत गाजत मंदिरात पुनर्स्थापित केले जाते.
ShrutiWD
यावेळी पूजेसाठी भाविकांची मंदिर परिसरात मोठी गर्दी जमलेली असते. भाविक अतिशय श्रद्धेने महावीरांची आराधनी करत असतात.

सायंकाळी पूर्ण मंदिराला दिव्यांची रोषणाई केली जाते. मंदिराच्या आजूबाजूला असलेल्या दुकानात पूजेसाठी लागणारी सर्व सामग्री उपलब्ध आहे.

पर्वकाळात भाविक मोठ्या प्रमाणात येत असल्याने त्यांची गरज भागविण्यासाठी अनेक तात्पुरती दुकानेही असतात. राजस्थानी हस्तकलाही यावेळी पहायला मिळते.


ShrutiWD
कधी जावे- या मंदिराचे दर्शन वर्षभरात केव्हाही घेऊ शकता. पण दर्शनाचा खरा आनंद मार्च ते एप्रिल महिन्यात होणाऱ्या पर्वावेळी घेता येतो.

कसे जावे- दिल्ली - मुंबई ब्रॉडगेज लाईनवर श्री महावीरजी रेल्वे स्टेशनहून चंदनगाव साडेसहा किलोमीटरवर आहे. हे स्थळ हिंदौनपासून अठरा, करौलीपासून २९ आणि जयपूरपासून १७६ किलोमीटरवर आहे. मंदिरापर्यंत जाण्यासाठी बस आणि टांग्याचीही व्यवस्था आहे.

शुक्रवारी कोणत्या मंत्राचा जप करावा?

महाराष्ट्र दर्शन : आदिशक्ती एकविरा आई

शुक्रवारी रात्री करा हा गुप्त उपाय, देवी लक्ष्मीच्या कृपेने पैशाची कमतरता भासणार नाही

शुक्रवारची आरती.... जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा ॥

श्री तुलजा भवानी स्तोत्र

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

Show comments