Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सत्यसाईबाबांचे 'शांतीधाम'

Webdunia
सत्यसाईबाबांचे शांतीधाम न पाहता दक्षिण भारताची यात्रा पूर्ण होऊच शकत नाही. आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील पुट्टपर्थी या छोट्याशा गावात सत्य साईबाबांचा भव्य आश्रम आहे. हा साई आश्रम (शांतीधाम) सत्य साईबाबांच्या भाविकांच्या वतीने बांधण्यात आला असून 'प्रशांति निलायम' (शांती प्रदान करणारे स्थान) या नावाने तो भारतभरात प्रसिध्द आहे.

WD
' प्रशांति निलायम' हा आश्रम भारतातील प्रमुख धार्मिक स्थळांमध‍ील एक आहे. सत्यसाईबाबांचे दर्शन घेण्यासाठी भाविक भारताच्या कानाकोपर्‍यातून येथे येत असतात. हळू हळू नावारूपाला आलेल्या या गावी मोठ्या हॉस्पिटलसोबत विमानतळही तयार करण्यात आले आहे. या आश्रमात श्री साईबाबांचे अनुयायी दररोज मंत्रजाप करतात. सत्य, प्रामाणिकता, शांती व सद्‍भाव अशा जीवन उद्दिष्ठांविषयी आलेल्या भाविकांना उपदेश देतात.

साई आश्रमातील सूर्यनारायण 'ॐ' च्या जपाने उगवतो. त्यानंतर प्रार्थना (सुप्रभातम) होते. आश्रम दिवसातून दोन वेळा भजन होतात. तसेच भाविक सत्य साईबाबांचे दर्शन देखील दोन वेळा करतात.

WD
दर्शन कार्यक्रमादरम्यान सत्य साईबाबा आपल्या भक्तांमध्ये फिरून काही भाविकांशी संवाद साधतात. त्यांना अंगारा प्रदान करतात. या व्यतिरिक्त भाविकांच्या जत्थ्याला बोलावून त्यांच्याशी वार्तालाप करतात.

दरवर्षी 23 नोव्हेंबरला श्री. साईबाबांच्या वाढदिवसानिमित्त आश्रम विद्युत रोषणाईने सजविण्यात येतो. भारतातील राजकीय पुढारी व नामांकित व्यक्ती त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी येत असतात.

कसे पोहचा ल-
महामार्ग- आंध्र प्रदेशातील अनंतपूर येथून पुट्टपर्थी 80 किलोमीटरवर आहे. राज्यातील बहुतेक प्रमुख मार्गांनी ते जोडले गेले आहे. त्यामुळे पुट्टपर्थीला जाण्यासाठी राज्यातील प्रमुख शहरातून सहज बस सेवा उपलब्ध होते.

रेल्वे मार् ग- अनंतपूर रेल्वे स्टेशनहून पुट्टापर्थी 80 किलोमीटरवर असून रेल्वे सेवा उपलब्ध आहे.

हवाई मार्ग- हैद्राबाद व बंगळूर विमानतळावरून येथे पोहचता येते. बंगळूर विमानतळ ते पुट्टपर्थी हे अंतर 120 किलोमटीर आह े.

शुक्रवारी कोणत्या मंत्राचा जप करावा?

महाराष्ट्र दर्शन : आदिशक्ती एकविरा आई

शुक्रवारी रात्री करा हा गुप्त उपाय, देवी लक्ष्मीच्या कृपेने पैशाची कमतरता भासणार नाही

शुक्रवारची आरती.... जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा ॥

श्री तुलजा भवानी स्तोत्र

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

Show comments