Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वाचन संस्कृती

- डॉ. उषा गडकरी, नागपूर

Webdunia
NDND
' वाचाल तर वाचाल' ही म्हण आजच्या घडीला किती समर्पक आहे हे आपण सर्वच जाणतो. आजच्या मनुष्याच्या ठिकाणी असणारे ज्ञान ही त्याची फार मोठी शक्ती आहे. या शक्तीच्या साह्याने तो सुबुद्ध आणि प्रगल्भ तर होतोच परंतु त्याच्या कार्यसंस्कृतीवर सुद्धा त्याचा प्रभाव पडतो. मागल्या पिढीपेक्षा आताच्या पिढीचे वाचन अगदी अल्प झाले आहे अशी तक्रार सर्वच थरातून वाढले आहे. ती गोष्ट सत्यही आहे कारण वाचनाव्यतिरिक्त रेडिओ, टेलिव्हिजन, कंप्युटर, चित्रपट, नाटके, इतर मनोरंजनाची साधने इतकी जास्त वाढली आहेत की या सर्व गलबल्यात मनुष्याला वाचण्यासाठी निवांतपणाच मिळे नसा झाला आहे.

अलीकडच्या काळात आपल्या मोबाईल फोनवरसुद्धा विशिष्ट नंबर फिरविल्याबरोबर आजच्या घडीला जगातील कानाकोपर्‍यात घडणार्‍या घटकांची अद्ययावत माहिती प्राप्त होते. जुन्या पिढीपाशी ही अद्ययावत साधने नसल्यामुळे जास्तीत जास्त वाचनातून ते आपली ज्ञान-लालसा भागवीत असत. परंतु जुन्या पिढीमध्ये शिक्षणाचा फारसा प्रसार झालेला नव्हता. जवळ जवळ 80 टक्याच्या वर जनता निरक्षरच होती त्यामुळे वाचनाचा मक्ता काही सुधारलेल्या सु‍शीक्षित समाजापुरताच सिमीत होता आता शिक्षण सर्व सामान्यापर्यंत पहोचले आहे परंतु इतर प्रसार माध्यमांच्या बाहुल्यामुळे प्रत्यक्ष वाचन आणि तेही कसदार वाचन निश्चितच कमी झालेले आहे.

भारतीय परंपरेत, आपल्या प्राचीन संस्कृतीत ज्ञानाचा अमर्याद खजिना निरनिराळ्या पोथ्या, पुराणे, धार्मिक ग्रंथ यात साठविलेला आहे. पूर्वीच्या पिढीत मुठभर शास्त्री-पंडितांच्या हाती हे ज्ञानभांडार होते. ब्रिटिश काळांत इंग्रजी शिक्षणाच्या संस्कारतून प्रबोधन काळाची महूर्तमेढ रोवली गेली. नवशिक्षणातून ज्ञानाची नवीन खिडकी उघडली गेली. आणि पाश्चात्य, तत्वज्ञान, विज्ञान, संस्कृती, इतिहास आणि परंपरा यांची ओळख आम्हाला झाली. त्यातून विचारांची नवी दिशा आम्हाला प्राप्त झाली. त्याचा आपल्या जीवन शैलीवर प्रभाव पडू लागला. पाश्चात्याचे अनुकरण करण्याची वृत्ती बळावली. यांच्यातील शिस्त, प्रामाणिकपणा, चिकाटी आणि कर्तव्यत्परता इत्यादी गुणांचा स्वीकार करण्याऐवजी त्यांची बिनधास्त, स्वैर आणि बेपर्वा वृत्ती आम्ही घेतली. संस्कारांची मातब्बरी आम्हाला वाटेनाशी झाली. अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊन आम्ही त्यांच्या जीवनशैलीची भ्रष्ट नक्कल करू लागलो. त्यांतून आपल्या संस्कृतीमधील काय मूल्यवान आहे याचे भान आम्ही हरवून बसलो व त्यांच्या संस्कृतीतील मूल्यवान गोष्टी स्वीकारण्याचे आम्ही टाळू लागलो.

सध्याची अवस्था तर एक प्रकारची कुंठावस्था आहे असे मला वाटते. लहानपणी जुन्या पिढीत मुलांच्या हातात इसापनीती, साने गुरूजींच्या संस्कारक्षम गोड गोष्टी, 'श्यामची आई' या सारखी पुस्तके असायची. आताची मुळे सलग पानभर नाही लिहिलेले असेल तर ते सुद्धा वाचायची तसदी घेत नाही. चित्रांच्या मार्फत 2-2 ओळींची माहिती संकलित केलेली कार्टून्स त्यांना जास्त आवडतात, दीर्घ कथा, लघु कादंबरी, मोठी वैचारिक पुस्तके, सुंदर कवितांचा संग्रह या गोष्‍टी तर त्यांच्या आजुबाजुला फिरकत सुद्धा नाही.

माझ्या स्मरणानुसार मी आठवीची परीक्षा पास केल्यानंतर उन्हाळ्याच्या सुटीत त्या वेळी वि. स. खांडेकरांची ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त 'ययाती' ही दीर्घ कादंबरी (जवळ जवळ 450 पृष्ठे) 2 दिवसात वाचून पूर्ण केली होती. कारण आमच्या घरी तसे वातावरण होते. सर्व प्रकारची उत्तमोत्तम पुस्तके, नियतकालिके, मासिके आमच्या घरी येत असत. लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच वाचनाची आवड होती. लहानपणी एकदा हा वाचन संस्कार झाला म्हणजे तो तरुण, प्रौढ आणि वृद्धावस्थेपर्यंत कायम राहतो, यात शंका नाही. विविध प्रकारच्या कथा, कादंबर्‍या, कविता, ललित साहित्य यातून एक विलक्षण आल्हाद आणि आनंद व्यक्तीला प्राप्त होतोच शिवाय त्याचे जीवन समृद्ध, संपन्न मानते. मन खर्‍या अर्थाने श्रीमंत होते. वैचारिक ग्रंथांच्या वाचनातून त्याच्या बुद्धीला धार चढल्या वाचून रहात नाही.

अलीकडे हा वाचन संस्कारच घराघरातून हरवला आहे. अगदी बालवर्गापासून परीक्षा आणि त्यात मिळणारी टक्केवारी यालाच अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त अन्य वाचन करण्याची विद्यार्थ्यांची प्रवृतीच नष्ट झाली आहे. पालकही याबाबत उदासीन झाले आहेत. शाळा, परीक्षा, शिकवणी वर्ग आणि डॉक्टर किंवा इंजिनिअर बनण्याची दुर्दम्य आकांक्षा त्यातून निर्माण होणारी जीवघेणी स्पर्धा, त्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी वाट्टेल त्या वैध/अवैध मार्गाचा अवलंब या सर्व दुष्चक्रात आताचा पाल्य आणि पालक दोघेही अडकले आहेत त्यातून वेळ काढून परीक्षा निरपेक्ष, निखळ आनंद देणारे वाचन करण्यास त्यांना फुरसतच नाही.

वाचन समृद्ध असले म्हणजे लेखनाचीही प्रवृत्ती प्रबल होते, कल्पनाशक्तीला वाव मिळतो, रसिकता वाढीस लागते सृजनशीलतेला वाट सापडते, सहृदयता, दुसर्‍याच्या दु:खाची जाणीव, त्यांस आवश्यक असणारे संवेदनशील मन यांस खतपाणी मिळते. खर्‍या अर्थाने मानुषतेचे मूल्य अंगी बाणते. सामाजिक जाणीव दृढ होते. इतरांबाबत, समाजाबाबत, आपली काही कर्तव्ये आहेत याचे भान प्राप्त होते. माता, पिता, शेजारी, समाज आणि राष्ट्रापर्यंत आपली कही बांधिलकी आहे याची जाणीव जागृत राहते. मन संकुचित, क्षुद्र गोष्टीत अडकत नाही. ते विश्वात्मक होते. वाचनामुळे माणसाला माणूस म्हणून असलेल्या अस्तित्वाचे मोल किती अनमोल आहे याचे भान प्राप्त झाल्याशिवाय रहात नाही.

फोटो गॅलरीसाठी येथे क्लिक करा .....

मनिका बत्रा आणि शरथ कमल पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला आणि पुरुष संघाचे नेतृत्व करतील

Russia-Ukrain War: रशिया युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षां विरोधात अपप्रचार करत असण्याचा अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेचा दावा

भाजपने रचला संपूर्ण कट, घटनेच्या वेळी केजरीवाल घरी नव्हते स्वातीचे आरोप खोटे असल्याचा अतीशी म्हणाल्या

IPL 2024 MI vs LSG: आज रोहित MI साठी खेळणार शेवटचा सामना, चाहत्यांचा प्रतिक्रिया व्हायरल

MI vs LSG : मुंबईच्या पलटनचा लखनौशी सामना, लखनौ सामना जिंकण्याच्या प्रयत्नात, प्लेइंग 11 जाणून घ्या

शनि साडेसाती चिंतन कथा

Sleep Divorce कपल्समध्ये स्लीप डिव्होर्सचा ट्रेंड, जाणून घ्या फायदे आणि तोटे

Chilled Beer फक्त थंडीतच बिअरची चव चांगली का लागते? याचे कारण संशोधनातून समोर आले

Raw or Cooked Sprouts कच्चे की उकडलेले स्प्राउट्स आरोग्यासाठी फायदेशीर ? जाणून घ्या खाण्याची योग्य पद्धत

एमबीए मास्टर इन कंप्यूटर मैनेजमेंट मध्ये करिअर करा

Show comments