Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अखेरीस निषेधाचा स्वर...

किरण जोशी

Webdunia
साहित्य संमेलनाध्यक्ष डॉक्टर आनंद यादव यांच्या संदर्भात वारकऱ्यांनी घेतलेल्या भूमिकेवर आजपर्यंत चकार शब्द न काढणाऱ्या साहित्यिकांनी अखेर जनतेच्या आणि माध्यमांच्या दबावानंतर वारकऱ्यांच्या कथित समांतर 'सेन्सॉर बोर्ड ा' विरोधात निषेधाचा झेंडा उभारण्याचे धैर्य दाखवले.

राज्यातील प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्याचा उपभोग घेण्याचा अधिकार आहे. काही जणांनी साहित्य संमेलनात वाद निर्माण करून साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्तींच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रयत्न केला. त्यांचा या संमेलनात निषेध करण्यात येत असल्याच े नमू द कर त संमेलनाध्यक्ष आनंद यादव यांच्या विरोधात वारकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाच ा अप्रत्यक्षरित्य ा निषेध करणार ा ठराव आज साहित्य संमेलनाच्या समारोप कार्यक्रमात मांडण्या त आला.

प्रकाशक आणि वितरकांनी समाजातील जबाबदारीचे भान ठेवावे असे नमूद करत, महाराष्ट्र सरकारने यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी या ठरावात करण्यात आली आहे.

आज संमेलनाच्या समारोप सत्रात वारकऱ्यांविरोधात ठराव करण्याचा निर्णय साहित्य मंडळाच्या बैठकीतच घेण्यात आल्याने आणि मेहता यांना झालेल्या धक्काबुक्कीनंतर ते आज संमेलनाध्यक्ष आनंद यादव यांच्या भाषणाच्या प्रती पुन्हा मागण्याची शक्यता असल्याने पोलिस बंदोबस्तात समारोपाचा कार्यक्रम घेण्यात आला.

महामंडळाचे सदस्य के एस अटकरे यांनी ठराव मांडण्यास सुरुवात केली. मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिस अधिकारी आणि नागरिकांना तसेच साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील कालवश झालेल्या व्यक्तींना सुरुवातीला श्रद्धांजली वाहण्याचा ठराव मांडण्यात आला.

यानंतर गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या महाराष्ट्र आणि कर्नाटकवादाचे मूळ असलेल्या बेळगाव प्रश्न सोडवण्याची मागणी दरवर्षी प्रमाणे ठरावाद्वारे याही संमेलनात करण्यात आली.

राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असून, या प्रश्नाच्यामुळाशी जात सरकारने शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याचा प्रयत्न करण्याची मागणीही ठरावाद्वारे करण्यात आली.

महाबळेश्वर देवस्थानाचे संरक्षण आणि संवर्धन करत महाबळेश्वरचा समावेश विशेष देवस्थानात करण्याची मागणीही ठरावाद्वारे केंद्र सरकारकडे करण्यात आली.

यानंतर महामंडळाच्या सदस्य उषा तांबे यांनी वारकऱ्यांचे नाव न घेता त्यांचा निषेध करणारा ठराव वाचून दाखवला.

साहित्य संमेलनात वाद निर्माण करून साहित्यिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा काही जणांनी प्रयत्न केल्याने हे संमेलन त्यांचा निषेध करत असल्याचे त्यांनी स्पष्ट करताच काही साहित्यिकांनी टाळ्यांनी ठरावाचे स्वागत केले.

साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी सूचक म्हणून हा ठराव मांडला तर अनंत परांजपे यांनी या ठरावाला अनुमोदन दिले.
सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

सर्व पहा

नवीन

काकडीच्या सालीने हा हेअर मास्क बनवा, केस मऊ आणि सुंदर होतील

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

प्रत्येक नात्यात गोडवा आणि सकारात्मकता असली पाहिजे

डिप्लोमा इन साउंड इंजिनीअरिंग मध्ये करिअर करा

हिवाळ्यात ही गोष्ट पाण्यात उकळून प्या, आरोग्यासाठी वरदान आहे

Show comments