Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

संमेलनाध्यक्ष डॉ. यादव यांचा राजीनामा

Webdunia
बुधवार, 18 मार्च 2009 (15:27 IST)
' संतसूर्य तुकाराम' या कादंबरीवरून उद्भवलेल्या वादाला कंटाळात अखेर महाबळेश्वर येथील नियोजित मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. आनंद यादव यांनी अखेर पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे अभूतपूर्व पेच निर्माण झाला आहे. महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी संमेलन होणारच असे सांगितले असले तरी नवे अध्यक्ष कधी आणि कसे निवडणार हा प्रश्नच आहे.

डॉ. आनंद यादव यांनी लिहिलेल्या संतसूर्य कादंबरीतील काही भागावर वारकरी मंडळींनी आक्षेप घेतला होता. त्यापुढे मान तुकवत डॉ. यादवांनी ही कादंबरीच मागे घेतली. पण तरीही वारकर्‍यांचे समाधान झाले नाही. डॉ. यादवांनी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचाही राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली होती. त्यासाठी वारकरी आंदोलनाच्या तयारीतही होते. महाबळेश्वरला साहित्य संमेलनाच्या मंडपात आंदोलन करण्याचा त्यांचा इरादा होता. यातून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसही तयारीत होते.

मात्र, डॉ. यादवांनी मंगळवारी संध्याकाळी अचानक महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यालयात जाऊन अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन टाकला. या राजीनाम्याची कारणमीमांसाही स्पष्ट केली नाही. दरम्यान, परिषदेच्या पदाधिकार्‍यांनी त्यांनी समजाविण्याचा प्रयत्न केला. परंतु, डॉ. यादव त्याला बधले नाहीत, असे समजते.

आता वीस तारखेपासून सुरू होणार्‍या साहित्य संमेलनाचे काय होणार याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. आयत्यावेळी राजीनामा दिल्यानंतर नवा अध्यक्ष निवडण्याचा इतिहास नाही. अशी स्थिती पहिल्यांदाच उद्भवली आहे. त्यामुळे कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेतला जात आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

Health Tips: प्रथिनांच्या कमतरतेवर मात कशी करावी

कोणते योगासन कानांसाठी योग्य आहे जाणून घ्या

Winter Special Recipe : हे दोन सूप नक्की ट्राय करा

इस्ट्रोजेन संतुलित करण्याचे 5 प्रभावी मार्ग जाणून घ्या

Show comments