Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हिवाळ्यात काळजी घ्या बाळाची...

वेबदुनिया
WDWD
हवामानात अचानक झालेल्या बदलाचा प्रभाव लहान मुलांवर सर्वाधिक पडतो. इतर ऋतुंच्या मानाने हिवाळ्यात मुले ताप, सर्दी, खोकला, अस्थमा, कफ आदी आजारांच्या घेर्‍यात सापडतात. या हिवाळ्यात आपण आपल्या पाल्याच्या तब्बेतीची वेळेत काळजी घेतली पाहिजे.

हिवाळ्याची चाहूल लागताच लहान मुलांच्या खाण्यापिण्यापासून तर त्यांच्या कपडयापर्यंत बदल करणे आवश्यक असते. मुलांना आंबट व थंडगार पदार्थ खाण्यास देऊ नये. हिवाळा म्हणजे तब्बेत कमावण्याचा ऋतू आहे. त्यामुळे लहान मुलांच्या दररोजच्या आहारात सुकामेवा, फळ, दूध आदींचा समावेश करावा.

हिवाळ्यात थंडगार हवेपासून बचावासाठी व शरीर गरम ठेवण्यासाठी मुलांची तेलाने मालिश करणे गरजेचे असते. अंघोळीआधी मुलांची तेलाने मालिश करावी. त्यानंतर त्याला काही वेळ कोवळ्या उन्हात धरावे. कोमट पाण्याने त्याची अंघोळ घालून, कपडे परिधान करुन पुन्हा उन्हात बसवावे. त्याने 'ड' जीवनसत्व मिळत असते.

बदलत्या हवामानानुसार आपल्या खाण्यापिण्यातही बदल केला पाहिजे. मुलांना उकाळून गार केलेले पाणी पिण्यास दिले पाहिजे. हिवाळ्यात मुले पाणी पिण्याचे नखरे करतात. शरीरास योग्य प्रमाणात पाणी न मिळाल्याने त्याचा परिणाम मुलांच्या आरोग्यावर होतो. त्यामुळे मुलांना दिवसभरात थोड्या थोड्या वेळाने पाणी पाजले पाहिजे.
WDWD


मुलांचे थंडीपासून संरक्षण व्हावे म्हणून उबदार कपडे परिधान करणे गरजेचे आहे. इनर, स्वेटर, स्लेक्स, हातापायात मोजे हा सेट हिवाळ्याच्या सुरवातीला तयार ठेवणे आवश्यक असते.
लक्षात ठेवा:-
* हिवाळ्यात मुलांना दुपारी फिरायला न्यावे.
* स्वेटर, टोपी घालावी कारण त्यामुळे बाळाच्या त्वचेवर उन्हाचा काही परिणाम होणार नाही.
* मुलांना विजेवर चालणार्‍या उपकरणांपासून दूर ठेवावे.

INDIA युतीने ठरवले आहे PM कँडिडेटचे नाव, उद्धव ठाकरे यांचा मोठा दावा

उत्तर प्रदेशमध्ये 5 वार्षांच्या चिमुकल्याची हत्या

सुकमा एन्काऊंटर: पोलीस आणि नक्षलवादींमध्ये लढाई, गोळीबारामध्ये 1 माओवादी ठार

महाराष्ट्रात एका कपलने आवासीय योजनेच्या नावाखाली 1.48 कोटी रुपये लुटले

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकतंत्र संपुष्टात आणता आहेत- अरविंद केजरीवाल

कूलरचे पाणी फक्त 2 दिवसांनी गलिच्छ दिसू लागते, म्हणून या 7 हेक्सचे अनुसरण करा

Beauty Advice : घरीच बनवा केमिकल फ्री ब्लश

उन्हाळ्यामध्ये नेहमी खावे अक्रोड, जाणून घ्या योग्य वेळ आणि योग्य पद्धत

तुम्हालाही सकाळी उठल्यावर मळमळल्या सारखे वाटते का? ही गंभीर कारणे असू शकतात

लिक्विड लिपस्टिक सहज काढत नाही? या हॅकच्या मदतीने हे काम 1 मिनिटात होईल

Show comments