Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Monday, 28 April 2025
webdunia

Cleaning of wooden items स्वच्छता किचनमधील लाकडी वस्तूंची

Cleaning of wooden items in the kitchen
, बुधवार, 2 ऑगस्ट 2023 (09:30 IST)
Cleaning of wooden items in the kitchen  किचनमधील लाकडीच्या वस्तू तारेच्या घासणीनं घासता येत नाही. त्यामुळे तेलकटपणा आणि ओशटपणा घालविण्यासाठी गरम किंवा कोमट पाणी वापरा.
 गरम पाण्यात एका लिंबाचा रस मिसळा. त्यात खरकटी लाकडी उपकरणं बुडवून ठेवा. 15 मिनिटांनंतर बाहेर काढून उन्हात सुकवा.
 व्हाईट व्हिनेगरमध्ये थोडासा मध मिसळा. ही पेस्ट फेटून लाकडी उपकरणांवर लावून ठेवा. काही वेळानंतर भांडी पाण्यानं धुऊन उन्हात सुकवा.
कोमट पाण्यात तीन-चार चमचे मीठ किंवा बेकिंग सोडा मिसळून त्यात लाकडी वस्तू ठेवल्यास त्या स्वच्छ होतात.
 काही आंबट फळांमध्ये व्हिटॉमिन सीची पर्याप्त मात्रा असते. खराब झालेलं लिंबू, संत्रं, मोसंबी व इतर आंबट फळांचा रस लाकडी भांडी स्वच्छ करण्याचा कामी येऊ शकतं.
 खराब झालेल्या लाकडी उपकरणांवर बेकिंग सोडा आणि लिंबाच्या रसाचं मिश्रण लावून ठेवावं. काही वेळ उपकरण उन्हात ठेवून मग धुऊन घ्यावी. 
नियमितपणे हे उपाय केल्यास उपकरणांवर चमक आलेली दिसते आणि चिकटपणाही नाहीसा होतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Crossing your legsआपणही पायावर पाय ठेवून बसत असाल तर हे वाचून घ्या