Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दिवाळीची शॉपिंग करण्या अगोदर लक्ष द्या!

दिवाळीची शॉपिंग करण्या अगोदर लक्ष द्या!

वेबदुनिया

सणासुदीला बाजारात अतिशय उत्साहाचे वातावरण असते. करोडो रुपयांची उलाढाल होते, परंतु अशावेळी आंधळेपणाने
खरेदी केल्यामुळे फसगत होण्याची शक्यता असते. हे टाळावे म्हणून खरेदीला निघण्यापूर्वी पुढील गोष्टी जाणून घेणे आवश्यक आहे.

1986 च्या ग्राहक संरक्षण कायद्याने ग्राहकाला पुढील सहा महत्वपूर्ण अधिकार मिळालेले आहेत. सुरक्षेचाहक्क, माहितीचा हक्क, वस्तू किंवा सेवा आपल्या इच्छेप्रमाणे निवडण्याचा हक्क, ग्राहकाचे म्हणणे ऐकले जाण्याचा हक्क, तक्रार निवारणाचा हक्क, ग्राहक म्हणून जबाबदारी व कर्तव्ये पार पाडण्यासाठी ग्राहक शिक्षण मिळवण्याचा हक्क.

या हक्कांच्या आधारे आज सर्वसामान्य ग्राहक पुढील प्रकारच्या व्यवहारात तक्रार दाखल करून न्याय मिळवू शकतो.

खरेदी केलेल्या किंवा खरेदीच्या कराराने घेतलेल्या वस्तूंमध्ये दोष आढळणे.
भाड्याने किंवा भाड्याच्या कराराने घेतलेल्या सेवांबाबत त्रुटी किंवा उणिवा असणे.
अनुचित व्यापारी प्रथेने केलेले व्यवहार.
छापील किंमतीपेक्षा अधिक किंमत आकरली जाणे.
ग्राहकाच्या जीवाला किंवा सरुक्षिततेला धोका निर्माण होईल अशा वस्तूंची विक्री.
वरील हक्क आणि हक्कांची व्यापकता लक्षात घेऊन उपरोक्त प्रकारच्या तक्रारी बँका सेवा, आर्थिक सेवा, प्रवास, वीजपुरवठा, खाणावळी, हॉटेल्स, करमणुकीची साधने, माहिती प्रसारण, गृहनिर्माण, वैद्यकीय सेवा, शिक्षण ‍तसेच टेलिफोन, रेल्वे, विमान सेवा, बस सेवा आदि सार्वजनिक सेवांच्या संदर्भात आढळून आल्यास ग्राहक याबाबतीत तक्रार करून अन्यायाचे निवारण करू शकतो.

ग्राहकांना हक्क प्राप्त झाले आहेत, परंतु त्यांची जपवणूक करण्यासाठी व ते बजावण्यासाठी ग्राहकांनी काही कर्तव्ये पार पाडायला हवीत.

ही पथ्ये अवश्य पाळा
केवळ आकर्षक जाहिरातीला भुलून खरेदीला उद्युक्त होऊ नका. आपल्याला हव्या असलेल्या वस्तूची प्रथम आपल्याला गरज आहे किंवा नाही हे निश्चित करा. गरज नसताना खेरदी करणे टाळा.
रोजची औषधे खरेदी करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे केव्हाही हितावह असते.
खाद्यपदार्थ किंवा वाण सामान घेताना त्यात काही भेसळ नाही, याची खत्रकरून घ्यावी.
भेसळ कशी ओळखायची याची माहिती करून घ्यावी.
हल्ली शेव, चिवडा, वेफर्स, पापड इत्यादी वस्तू दुकानात उपलब्ध असतात. त्यांच्या उत्पादकांनी त्यात वापले जाणारे जिन्नस, त्या बनविण्याचे ठिकाण आदींची माहिती त्यांच्या वेष्टनावर नियमानुसार दर्शविलेली नसते. तेव्हा अशावस्तू आपल्या खात्रीच्या दुकानाशिवाय कोणाकडूनही घेऊन नयते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दिवाळीतले किल्ले-एक आठवण