Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ऑफिसमध्ये लंचनंतर झोप येते का? पाच उपाय अवलंबवा

Webdunia
बुधवार, 27 मार्च 2024 (07:30 IST)
झोप येत असल्यास फळांचे सेवन करावे किंवा ज्यूसचे सेवन करावे. जेवण केल्यानंतर थोडावेळ फिरावे. तसेच संगीत ऐकल्याने झोप येत नाही. ऑफिसमध्ये लंच नंतर झोप येत असल्याचे कारण हे आहे की, तुमचे शरीर थकलेले आहे. जेवण केल्यानंतर अनेक लोकांना झोप येते. यामुळे कामात लक्ष लागत नाही. यामुळे काम पेंडिंग राहते आणि वेळेवर पूर्ण होत नाही. तसेच नविन काम करणे देखील कठीण जाते. याकरिता लंच नंतर झोप येऊ नये म्हणून या टिप्स अवलंबवा. 
 
1. फळ खावे किंवा ज्यूस प्यावे-     
एक आरोग्यदायी आणि पोषणने भरपूर डाइट तुमच्या उर्जेला चालना देईल आणि तुम्हाला सुस्ती येण्यापासून दूर ठेवेल. लंच नंतर एक सफरचंद, केळे किंवा इतर कोणतेही तुमचे आवडते फळ सेवन करावे किंवा फळांचे ताजे ज्यूस देखील फायदेशीर असते. 
 
2. थोडावेळ चालावे किंवा योग करावा-  
तुमच्या ऑफिसमध्ये लंच नंतर थोडावेळ चालावे किंवा योग करावा. हा एक चांगला उपाय आहे. हा उपाय तुम्हाला ताजेपणा देईल तसेच आरोग्य देखील चांगले राहिल 
 
3. कमी जेवण करावे-       
लंचनंतर झोप येण्याचे मुख्य कारण आहे की  आपण गरजेपेक्षा जास्त जेवण करतो. अश्यावेळेस जेवढी भूक असेल त्यापेक्षा एक पोळी कमी खावी. भात, पनीर यांसारखे जड पदार्थ टाळावे जर तुम्ही नाश्ता पोटभर करत असाल तर लंच कमी करावा. 
 
4. संगीत ऐका-  
लंचनंतर काही वेळ संगीत ऐकावे. संगीत तुमच्या मनाला ताजे तवाने  करेल  तुम्ही तुमच्या आवडीचे गाणे निवडून ते ऐकावे त्यामुळे तुम्हाला ताजे तवाने वाटेल व कामात देखील लक्ष लागेल. 
 
5. कलरफुल वस्तू बघा-       
ही एक खूप क्रिएटिव आईडिया आहे तुम्हाला झोप येऊ नये म्हणून आपल्या डेस्कटॉप, मोबाइल, पुस्तक किंवा ऑफिसच्या बाहेर बागीच्या  मध्ये सुंदर डार्क रंग पहा. अश्याने तुमच्या मेंदु सक्रिय होईल. सोबतच वाइब्रेंट आणि सुंदर रंग पहिल्याने डोक्यामध्ये डोपामाइन रिलीज़ होतो. अश्यावेळेस चांगले फोटो पहा किंवा बागीच्यातील सुंदर फुले पहा. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्यमाहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता,विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी 
संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik  
 

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

उन्हाळ्यात रोज अंडी खाणे योग्य आहे का? प्रमाण काय असावे जाणून घ्या

मानसिकरीत्या आहात चिंतीत तर हृदयावर पडेल दबाव, करा हे योगासन

Mother's Day 2024 मदर्स डे का साजरा केला जातो हा दिवस, जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या 3 पैकी कोणत्याही नैवेद्याने भगवान विष्णू प्रसन्न होतील, सोपी पद्धत वाचा

पती-पत्नीच्या वयात किती फरक असावा?

पुढील लेख
Show comments