rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Easy Hacks: बटाट्याचे हेक्स खूप उपयुक्त आहे

Easy Hacks: Potato hacks are very useful useful potato hacks amezing thinks can do with potato article in marathi
, बुधवार, 24 फेब्रुवारी 2021 (08:50 IST)
बटाट्याचा वापर आपण खाण्यासाठी  तर करतोच  परंतु बटाटा हे खूप कामी येत. या मुळे अनेक कामे सोपे बनतात. चला तर मग जाणून घेऊ या.  
 
1  हात  भाजल्यावर -
स्वयंपाक करताना हात भाजतो आणि जळजळ होते या साठी बटाटा कापून भाजलेल्या जागी ठेवा या मुळे आराम मिळेल. शरीरात खाज होत असल्यास बटाटा चिरून घासून घ्या. खाजपासून आराम मिळेल.  
 
2 अन्नामध्ये मीठ जास्त झाले असल्यास- 
आपण भाजी बनवता या मध्ये मीठ जास्त पडल्यावर बटाट्याचे चार भाग करून  भाजीमध्ये घाला आणि शिजवा जास्त झालेले मीठ कमी होईल.
 
3 गंज काढण्यासाठी -
गंज काढण्यासाठी आपण बेकिंग सोडा, व्हिनेगर किंवा इतर काही गोष्टी वापरता या साठी आपण बटाटा वापरू शकता. एवढेच नव्हे तर आरशावरील लागलेल्या गंज ला काढण्यासाठी आपण बटाटा वापरू शकता. या साठी गंजलेल्या ठिकाणी बटाटा कापून मीठ लावून  चोळून घ्या नंतर स्वच्छ कपड्याने पुसून घ्या.
 
4 दागिने स्वच्छ करण्यासाठी -
चांदीचे दागिने स्वच्छ करण्यासाठी एका भांड्यात बटाटे उकळवून घ्या.  
 नंतर बटाटे काढून घ्या आणि त्या पाण्यात चांदीचे दागिने 1 ते 2 मिनिटे घालून ठेवा नंतर स्वच्छ कपड्याने पुसून घ्या चांदीचे दागिने चकचकीत होतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अन्नाला चविष्ट करण्यासाठी कुकिंग टिप्स