असं म्हणतात की प्रेमाच्या गाडीला चालविण्यासाठी जोडीदाराची गरज लागते. दोघांनी सामंजस्याने समजून घ्यावे लागते, तेव्हाच आपसातील प्रेम आणि नातं टिकून राहतं. बऱ्याच वेळा असे दिसून आले आहे की काही न काही कारणांमुळे नात्यात दुरावा येतो. बऱ्याच वेळा कारणे लक्षात देखील येत नाही. चला आपण ती कारणे जाणून घेऊ या. ज्यामुळे नात्यात दुरावा येतो आणि नातं तुटतात.
1 संभाषणात अंतर असणे- आपली इच्छा आहे की आपले नाते टिकून राहावे तर एकमेकांशी बोला. आपल्या आणि जोडीदारामध्ये विसंवाद आहे तर याचा अर्थ असा आहे की आपसात अविश्वास आहे. म्हणून नात्यात दुरावा येतो किंवा नातं तुटतो.
2 संशय घेणे- नात्यात विश्वास नसेल तर संशय तिथे येतो. आणि एकदा नात्यात संशय आला की ते नाते टिकत नाही. संशय नात्याला तोडतो. म्हणून नात्यात संशयाला येऊ देऊ नका. एकमेकांवर विश्वास ठेवा.
3 लपवा-छपवी -आपण एखाद्यासह नात्यात असता तेव्हा त्याला आपल्या विषयी सर्व आणि पूर्ण माहिती द्या. त्यापासून काहीही भूतकाळ लपवू नका. लपवा छपवीमुळे देखील नात्याला तडा जाऊ शकतो.
4 दुर्लक्षित करणे- काही लोक आपल्या जोडीदारासह त्याच्या प्रत्येक समस्येत पाठीशी खंबीर पणे असतात तर काही दूर पळतात .या मुळे देखील नात्यात दुरावा येऊन नातं तुटतात. आपण आपल्या जोडीदाराकडे अशा वेळी दुर्लक्षित करू नका त्याची साथ द्या.