व्हॉट्सअॅप चे अकाउंट आणि डेटा अँड्रॉइड फोन मधून डिलीट करण्यासाठी काय करावे.
* सर्वप्रथम व्हॉट्सअॅप अकाउंट उघडा आणि वरील उजव्या बाजूस असलेले तीन डॉट्स वर क्लिक करा.
* नंतर सेटिंग मध्ये जा आणि या मध्ये अकाउंट सेटिंग ऑप्शन वर क्लिक करा. आपल्याला अकाउंट डिलीट करण्याचे ऑप्शन दिसेल.
* आपल्या समोर नंबर प्रविष्ट करण्याचे ऑप्शन येईल. या मध्ये आपल्याला आपले अधिकृत मोबाईल नंबर घालायचा आहे. नंतर डिलीट माय अकाउंट (Delete My Account )वर क्लिक करायचे आहे.
* नंतर आपल्याला विचारण्यात येईल की आपल्याला आपले अकाउंट डिलीट का करायचे आहे. असं केल्यावर आपल्याला डिलीट माय अकाउंट वर क्लिक करायचे आहे. आणि आपले
व्हॉट्सअॅप अकाउंट डिलीट करण्यात येईल.
IOS वरून अकाउंट डिलीट करण्यासाठी काय करावे-
अँड्रॉइड आणि IOS दोन्हीचे काम वेगळे असतात. या साठी देखील आपल्याला त्याच प्रमाणे करावयाचे आहे.
* व्हॉट्सअॅपच्या सेटिंग मध्ये जाऊन Account > Delete My Account वर क्लिक करायचे आहे.
* आपले नंबर प्रविष्ट करा जेणे करून आपल्या फोन मधून अकाउंट डिलीट करण्यात येईल.