Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तळहात आणि पायात घाम येणं दुर्लक्षित करू नका,हे उपचार करा

तळहात आणि पायात घाम येणं दुर्लक्षित करू नका,हे उपचार करा
, बुधवार, 24 मार्च 2021 (18:31 IST)
बऱ्याच लोकांना हातात आणि पायात घाम येतो. बरेच लोक या कडे दुर्लक्ष करतात. काहींना असे वाटते की हे एखाद्या गंभीर आजाराचे लक्षणे तर नाही. घाम येणं ही एक सामान्य क्रिया आहे. हे शरीरातील तापमानाला सामान्य ठेवतो. ज्यांना हाताला आणि तळपायात जास्त घाम येतो, त्यांना वैद्यकीय भाषेत हायपरहायड्रोसिस म्हणतात.कधी कधी या कडे दुर्लक्षित करणे बरे नाही. हे मधुमेह, मेनोपॉज,किंवा हायपरथायराईडीझम देखील असू शकते. म्हणून ह्याला गांभीर्याने बघावे. 
 उपचार- 
* ध्यान -ध्यान बऱ्याच आजारांवरचे इलाज आहे. तणावामुळे देखील  घाम येऊ शकतो. ध्यान केल्याने तणाव कमी होतो. तणाव कमी झाला की घाम कमी येतो. म्हणून दररोज ध्यानाचा सराव करावा. असं केल्याने या समस्येपासून सुटका मिळवू शकतो.  
 
* बेकिंग सोडा- दिवसातून एकदा गरम पाण्यात बेकिंग सोडा मिसळा आणि हात आणि तळपाय त्या पाण्यात बुडवून ठेवा. काही वेळा असं कराल तर संपूर्ण दिवस आपल्याला ही समस्या उद्भवणार   नाही. 
 
* अत्याधिक मसालेयुक्त अन्न घेऊ नका- अत्याधिक मसालेयुक्त अन्न खाल्ल्याने देखील घाम येतो. कांदा,लसूण आणि इतर मसाले खाल्ल्याने देखील घाम येतो. शक्य असल्यास अधिक गरिष्ठ आणि मसालेयुक्त अन्न खाऊ नका. सादे आणि सात्विक अन्न खा.
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

होळी विशेष रेसिपी -खारे पारे