साहित्य-
500 ग्रॅम मैदा,200 ग्रॅम रवा,अर्धा कप तेल गरम केलेलं मोयन साठी , 2 लहान चमचे ओवा, मीठ, बेकिंग पावडर,तळण्यासाठी तेल.
कृती -
रवा मैदा एकत्र करून त्यात तेलाचे मोयन,मीठ,बेकिंग पावडर,ओवा घालून गरम पाण्याने घट्ट कणिक मळून घ्या. कणिक कपड्याने झाकून ठेवा.
मैद्याचा जाडसर गोळा बनवून लाटून घ्या. आणि सुरीने किंवा साच्याने खारे पाऱ्याला आकार द्या. कपड्यावर पसरवून द्या.
एका कढईत तेल तापत ठेवा आणि तेल तापल्यावर हे पारे तेलात सोडा आणि कुरकुरीत गुलाबी रंग येई पर्यंत तळून घ्या. टिशू पेपर वर पारे काढून ठेवा. थंड झाल्यावर खारे पारे डब्यात भरून ठेवा.