Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Pregnancy मध्ये हे पदार्थ खाणे टाळा

Webdunia
शनिवार, 13 फेब्रुवारी 2021 (13:03 IST)
गरोदर असताना खाण्यापिण्याच्या सवयींकडे खूप लक्ष द्यावं लागतं. जराशी चुक महागात पडू शकते. तसेच काही खाद्य पदार्थ असे आहेत जे प्रेग्नेंसीमध्ये खाणे टाळावे.
 
कच्ची अंडी
कच्च्या अंडीत सैल्मोनेला बॅक्टेरिया असल्यामुळे ताप, उलटी येणे, पोटात दुखणे तसेच लूज मोशन सारख्या समस्या उद्भवू शकतात. याने गर्भाशयात गाठी पडू शकतात ज्यामुळे प्री मॅच्योर डिलेव्हरी होण्याचा धोका वाढतो.
 
कॅफिन
कॉफी‍ पिण्याची सवय असली तरी कमी प्रमाणात कॅफिन घेणे योग्य ठरेल. याने बाळाच्या वजन व विकासावर विपरित परिणाम होऊ शकतो.
 
स्प्राउट्स
कच्चे स्प्राउट्स खाणे योग्य नाही. यात बॅक्टेरिया आढळण्याची शक्यता असल्याने हे खाण्याची इच्छा असली तरी शिजवून सेवन करावे.
 
मर्करी फिश
मर्करी विषारी असतं तसेच प्रदूषित पाण्यात आढळतं. जास्त प्रमाण मर्करीचे सेवन नर्व्हस सिस्टम, इम्यून‍ सिस्टम व किडनीला खराब करतं. मुलांच्या विकासावर याचा विपरित परिणाम होऊ शकतो. हे प्रदूषित समुद्रात आढळ्यामुळे समुद्री मासोळ्यांमध्ये मर्करी अधिक प्रमाणात आढळतं म्हणून गरोदर महिला तसेच ब्रेस्टफीडिंग करवत असणार्‍यांनी मर्करी आढळणारी मासोळीचे सेवन टाळावे.
 
हायफ्राय फिश
गरोदर महिलांना शेलफिश किंवा अर्धवट शिजवलेल्या फिशेसचे सेवन करु नये. शेलफिश सेवन केल्याने व्हायरसचा धोका असतो याचा दुष्परिणाम गर्भातील बाळावर पडू शकतो.
 
प्रोसेस्ड मीट
अर्धवट शिजवलेले मीट हानिकारक ठरु शकतं. हे खाल्ल्याने बॅक्टेरियल इंफेक्शनचा धोका वाढतो. याने बाळाला न्यूरोलॉजिकल आजार होऊ शकतात. म्हणून प्रोसेस्ड मीट खाणे टाळावे. स्टोरेजमुळे याने संक्रमण पसरण्‍याची भीति अधिक असते.
 
या व्यतिरिक्त अनपाश्चराइज्ड डेअरी प्रॉडक्सट्स घेणे टाळावे. तसेच कुठल्याही भाज्या व फळ खाण्यापूर्वी त्यांना व्यवस्थित धुणे अती आवश्यक आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

हिवाळा येताच पाठदुखीचा त्रास वाढू लागला तर या 5 उपायांनी लगेच आराम मिळेल

जर तुम्ही तुमच्या पायात खाज आणि संसर्गामुळे त्रस्त असाल तर हे 7 घरगुती उपाय करून पहा

Health Alert : शेवग्याच्या शेंगा आरोग्यासाठी हानिकारक आहे का?

तुमच्या आयुष्यासाठी योग निद्रा का महत्त्वाची आहे, जाणून घ्या त्याचे फायदे

सर्वांना आवडेल अशी झटपट मुगाच्या डाळीची चकली

पुढील लेख
Show comments