Festival Posters

घरच्या घरी तयार करा निरनिराळे क्लीनर्स

Webdunia
बुधवार, 2 जानेवारी 2019 (11:24 IST)
घरामध्ये साफसफाई करण्यासाठी आपण निरनिरळ्या क्लीनर्सचा वापर करीत असतो. घर आणि घरातील वस्तू निर्जंतुक व्हाव्यात या करिता मुख्यत्वे या क्लीनर्सचा वापर केला जात असतो. पण साफसफाई करण्याकरिता केवळ एकच क्लीनर असून काम भागत नाही. काचेच्या वस्तू पुसण्यासाठी एक क्लीनर, लाकडी सामानासाठी दुसरा, तर बाथरूम्स, घरातील फरशी ह्यांच्याकरिता देखील वेगवेगळ्या क्लीनर्सचा वापर आपण करीत असतो. ह्यासाठी आपले पुष्कळसे पैसेही खर्च होत असतात. त्यामुळे पैशांची बचत करून, तितकीच उत्तम सफाई देणारे काही क्लीनर्स आपण घरच्याघरी देखील तयार करू शकतो. एका स्प्रे बॉटलमध्ये व्हिनेगर आणि पाणी समप्रमाणात मिसळून हे मिश्रण स्टेनलेस स्टीलच्या वस्तू साफ करण्यासाठी वापरता येते. आजकाल फ्रीज, ओव्हन, टोस्टर, इत्यादी वस्तू स्टेनलेस स्टील फिनिशमध्ये जास्त पसंत केल्या जात आहेत. ह्या वस्तू हाताळताना ह्यांवर हातांचे ठसे उमटत असतात किंवा इतरही डाग पडत असतात. हे सर्व डाग घालवून स्टेनलेस स्टील चकविण्याच्या कामी पाणी आणि व्हिनेगरचे मिश्रण सहायक आहे. बाथरूम, किचनमधील नळ, किचनमधील सिंक चमकविण्यासही हे मिश्रण सहायक आहे. मात्र व्हिनेगर अ‍ॅसिडिक असल्यामुळे ग्रेनाईट किंवा संगमरवरी ओट्यावर वापरू नये.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

The National Panchayati Raj Day 2026 :भारतात पंचायती राज दिवस कधी आणि का साजरा केला जातो?

ऑफिसच्या धावपळीत सहज खाता येतील आणि दुपारी सुद्धा ताजे वाटतील असे ३ खास पदार्थ

दररोज दोन केळी खाण्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या

बीटेक शिवाय अभियंता बनण्यासाठी हे कोर्स करा

त्वचेसाठी स्क्रब खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा

पुढील लेख
Show comments