Dharma Sangrah

ऑफिसमध्ये 'कूल' राहण्यासाठी काही उपयोगी टिप्स

Webdunia
शनिवार, 27 एप्रिल 2024 (06:14 IST)
'वर्कींग वूमन'ला दिवसाचा सगळ्यात मोठा भाग ऑफिसच्या कामात घालवावा लागत असतो. कामाचा प्रचंड व्याप, टार्गेटचं डोक्यावर असलेलं ओझं, ऑफिसमधील पॉलिटिक्स, सहकाऱ्यांचे हेवे दावे अशा एक ना अनेक समस्यांच्या कचाट्यात ती अडकलेली दिसते. घर आणि कार्यालय यांच्यात उत्तम बॅलेन्स करण्यासाठी महिलांना शारीरिक व मानसिक ऊर्जांची आवश्यकता असते. जर ती महिलांकडे नसेल तर त्या जॉब करून घर सांभाळूच शकणार नाही. ऑफिसात नेहमी 'कूल' राहण्यासाठी खास टिप्स-
 
 एखाद्या दिवशी आपल्या लहानपणाचे छायाचित्र ऑफिसात घेऊन जावा. लंच करताना ते आपल्या सहकार्‍यांना दाखवावे. यामुळे तुम्हाला व आपल्या सहकार्‍यांना बालपणीचे दिवस आठवतील व एकुणात तुमचा दिवस आनंदात जाईल.
 
कार्यालयातील सहकार्‍यांची एक छोटीशी 'गॅंग' बनवून घ्यावी. वेळ प्रसंगी ती आपल्या कामी येईल. कार्यालयीन वेळ सोडून एकत्र येऊन एकमेकांचे सुख-दु:ख वाटून घेतले पाहिजे.
 
कामातून थोडा वेळ काढून ऑफिसमधील प्रत्येक क्यूबिमध्ये जाऊन आपल्या सहकार्‍यांना हाय-हॅलो केले पाहिजे. त्याने आपल्याला मानसिक समाधान मिळते तसेच कामात मनही लागते.
 
आपले मन प्रसन्न होईल, अशा काही वस्तू आपल्या डेस्कवर ठेवल्या पाहिजेत. पंधरा दिवसातून त्या चेंज केल्या पाहिजेत. ऑफिसच्या पॉलिटिक्समध्ये चुकूनही भाग घेऊ नका. त्यातून तुम्हाला मनस्तापाशिवाय काहीच मिळणार नाही. आपल्या एका सहकार्‍यांची गोष्ट दुसर्‍या सहकार्‍याला सांगू नका.
 
ऑफिसात कुणाशी वाद होणार नाही याची काळजी घेऊन सगळ्यांशी मित्रत्वाचे संबंध जोपासले पाहिजेत. घरच्या गोष्टीचा ऑफिस कामावर व ऑफिसातील गोष्टीचा घरातील वातावरणावर परिणाम होणार नाही, हे लक्षात घेऊन मन लावून आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

इसरो मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी हे कोर्स करा

लग्नाआधी तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिक चमकसाठी हे उबटन बनवा

उन्हाळ्यात कच्चा कांदा खाण्याचे फायदे जाणून घ्या

Parenting Tips: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलाला प्रेरणा कशी द्यावी

नैतिक कथा : चर्चेपेक्षा कृतीला प्राधान्य

पुढील लेख
Show comments