Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Regular Periods Naturally मासिक पाळी उशीरा येत असल्यास या गोष्टींचे सेवन करा

Irregular periods
, बुधवार, 13 जुलै 2022 (11:42 IST)
मासिक पाळी उशिरा येण्याची समस्या आजकाल सामान्य झाली आहे. याची अनेक कारणे आहेत. अनेकदा महिला यासाठी वेगवेगळे उपाय अवलंबतात. पण तरीही विशेष परिणाम दिसून येत नाही. प्रत्येक समस्येवर योग्य आहार हे औषध आहे असे म्हणतात. हे मासिक पाळीशी संबंधित समस्यांवर देखील लागू होते. तज्ञांप्रमाणे जर तुम्ही तुमच्या आहारात योग्य गोष्टींचा समावेश केला तर तुम्ही या समस्येपासून मुक्त होऊ शकता.
 
मासिक पाळी उशिरा का येते?
आजचे धावपळीचे जीवन आणि अस्वस्थ जीवनशैलीचा आपल्या आरोग्यावर सर्वाधिक परिणाम होत आहे. ज्यामुळे मासिक पाळीशी संबंधित समस्या उद्भवू लागतात. PCOD, अनियमित मासिक पाळी ही महिलांमध्ये आढळणारी एक सामान्य समस्या आहे. याशिवाय ताणतणाव, अतिव्यायाम, गर्भनिरोधक गोळ्या घेणे आदींमुळेही मासिक पाळी उशिरा येते. जर तुम्हाला ही समस्या असेल तर याचा अर्थ तुम्हाला वजन कमी करावे लागेल. स्वत:ला तंदुरुस्त ठेवावे लागेल. यासाठी व्यायाम आणि योग्य आहार घ्या.
 
हे मसाले वापरा
उशिरा मासिक पाळी येण्याची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात मसाल्यांचा समावेश करावा. यासाठी सकाळी एक चमचा हळद पाण्यासोबत घ्या. हळदीमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-ऑक्सिडंट्स आढळतात, ज्यामुळे तुमची मासिक पाळी वेळेवर सुरू होईल. याशिवाय शतावरी देखील खूप फायदेशीर ठरेल. ही एक नैसर्गिक औषधी वनस्पती आहे, जी अनेक समस्यांवर मात करण्यास मदत करते. तुम्हाला ते बाजारात सहज मिळेल. सर्वात प्रभावी उपाय म्हणजे सकाळी रिकाम्या पोटी पाण्यासोबत जिरे खाणे.
 
आहारात बटाट्याचा समावेश करा
पीरियड्समध्ये बटाटे खाण्याचे फायदे याबद्दल सर्वात मोठा गैरसमज आहे की बटाटे खाल्ल्याने तुम्हाला चरबी मिळते. पण तसे अजिबात नाही. मासिक पाळी उशिरा येत अससल्यास बटाटे खावेत. तुम्ही त्याची भाजी बनवू शकता किंवा इतर मार्गांनी आहारात समाविष्ट करू शकता. पोटॅशियम बटाट्यामध्ये आढळते, जे मासिक पाळी नियमित करण्यास मदत करते. पण फ्रेंच फ्राईज खाऊ नका.
 
शरीर डिटॉक्स करणे
शरीर डिटॉक्स करणे आवश्यक आहे. विशेषत: पीरियड्सच्या काळात, त्यामुळे या काळात तुम्ही ड्रिंक घेऊ शकता. पण यासाठी तुम्हाला बाजारात जाण्याची गरज नाही, तुम्ही घरीही बनवू शकता. त्यासाठी तुम्हाला फक्त अर्धा चमचा भाजलेले जिरे, अर्धा चमचा भाजलेल्या जवसाच्या बियांची पावडर, अर्धा चमचा पुदिना पावडर लागेल. या सर्व गोष्टी एका ग्लास पाण्यात मिसळा. हे पेय तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी किंवा दिवसाच्या कोणत्याही वेळी पिऊ शकता. हे पेय प्यायल्यानंतर तुम्हाला त्याचा परिणाम लवकरच दिसून येईल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

फ्रेंच फ्राइज़ रेसिपी (French fries Recipe)