Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दरवाजा बरंच काही सांगतो..

Webdunia
घरात प्रवेश करताना सुरुवातीला नजरेला पडणारं आणि बाहेर पडताना सर्वात शेवटी नजरेत येणारं हे मुख्य दार. मुख्य द्वारावरून घरमालकाची सौंदर्यसृष्टी एका क्षणात समजते. दरवाजा बरंच काही सांगतो..घराचं अंगण घराची कळा दर्शवतं असं म्हणतात. पण सध्या घरापुढे अंगण दिसणं तसं दुर्मिळच बनलं आहे. मात्र ही उक्ती अंगणाऐवजी 'मुख्य द्वार' हे शब्द पेरून वाचली तरीदेखील अगदी चपखल ठरावी.

घराची कळा अंगणावरून दिसते तशीच मुख्य द्वारावरूनही दिसते. घरात प्रवेश करताना सुरुवातीला नजरेला पडणारं आणि बाहेर पडताना सर्वात शेवटी नजरेत येणारं हे मुख्य द्वार. मुख्य द्वारावरून घरमालकाची सौंदर्यसृष्टी एका क्षणात समजते. कळकटलेलं, जळमटं लोंबत असलेलं, कधीही बोळा न फिरलेलं मुख्य दार घराच्या अंतर्गत रचनेबद्दल बरंच काही सांगून जातं. म्हणूनच अन्य बाबींबरोबरच घराचं दार आकर्षक असण्याकडे कटाक्ष ठेवायला हवा. दाराची चौकट, दारासाठी वापरले जाणारे मटेरियल, हँडल, लॉक, कडीकोयंडा या सर्व बारीक-सारीक बाबी काळजीपूर्वक निवडल्यास मुख्य दरवाजा आकर्षक आणि आगळावेगळा ठरू शकतो.

माणसांची सहज ये-जा होईल अशा पद्धतीने मुख्य दाराची रचना असावी. दारातून प्रवेश केल्यावर लगेचच छोटीशी बैठक ठेवल्यास पादत्राणे घालणे अथवा काढणे सोपे होते. दाराच्या आकर्षकतेबरोबरच सुरक्षा हा विषयही काळजीपूर्वक लक्ष देण्याचा आहे. संपूर्ण घराचे संरक्षण करणारा हा दरवाजा अत्यंत बळकट हवा. शक्य असल्यास सेफ्टी डोअरची सोय अधिक संरक्षण देऊ करते, मात्र या दोन दरवाजांची रचनाही सुसंगत असायला हवी. दरवाजाचे डिझाईन, टेक्स्चर आणि कलर या सर्वांमध्ये सुसंगती असणं गरजेचे आहे. सध्या बाजारात नानाविध प्रकारचे तयार दरवाजे उपलब्ध असतात.

ओरिजनल वूड फिनिशिंगपासून मॅलेमाईन अथवा मिरर पॉलिश असणारे दरवाजे लक्ष वेधून घेतात. त्यातील कुठली स्टाईल आपल्या घरासाठी योग्य आहे, याचा विचार करावा. दरवाजा आणि चौकट एकमेकांशी ताळमेळ साधणारी असावी. चौकटीचा बाज आणि वापरलं जाणारं मटेरियल पारंपरिक ढंगाचं असेल तर दरवाजाची घडणही तशाच पद्धतीची हवी. पूर्वी वाड्याला असायची तशा दारांची फॅशन सध्या चलतीत आहे. या दारांना छानशा चौकटी असतात. प्रत्येक चौकटीवर मंजूळ नाद करणार्‍या घंटा लटकवलेल्या असतात. कडीकोयंडाही जुन्या बाजाचा असतो. चौकटीवर छानसे तोरण लावलेले असते. वर इच्छित देवतेचा फोटो भिंतीतच बसवलेला असतो.

दारावर दिवाळीच्या दिवसात अथवा शुभकार्याप्रसंगी रोषणाई करण्याची सोय केलेली असते. अशी सुसज्ज रचना ऐन वेळचे काम हलके करतेच त्याचप्रमाणे दरवाज्यांची आकर्षकताही वाढवते. घरामध्ये अँटिक लूक ठेवला असेल तर अशा प्रकारच्या दरवाजाची रचना सुयोग्य ठरते. दरवाजा अधिक आकर्षक करण्यासाठी नेमप्लेट, दरवाजावरील प्रकाश योजना, लगतच्या भिंतीवर आकर्षक पोस्टर्स, पेंटिंग अथवा मिरर लावणे, दरवाजाजवळ हिरव्यागार झाडांच्या कुंड्या ठेवणे, एखादा हँगिंग शो पिस लावणे, विंड चाईम लावणे यासारखे उपायही योजना येतात. अलिकडे मुख्य दरवाजावर कॅमेरा लावण्याची पद्धत आहे. त्यामुळे दरवाजात कोण उभं आहे हे आतमधल्या डिस्प्ले बोर्डवर स्पष्ट दिसतं. यामुळे अनोळखी माणसाला टाळण्याचं स्वातंत्र्य राहतं. दरवाजाची रचना करताना या नवीन ट्रेंड्सची माहिती घ्यायला हवी.

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

Career in Master of Applied Management : मास्टर ऑफ अप्लाइड मॅनेजमेंट मध्ये करिअर करा

अचानक ब्लड प्रेशर वाढल्यास हा योगाभ्यास करणे

चविष्ट आलू जलेबी

Bra Wearing Benefits रोज ब्रा घालण्याचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर बनून करिअर करा, पात्रता जाणून घ्या

पुढील लेख
Show comments