Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Long Drive Tips : लाँग ड्राईव्हसाठी जातांना या गोष्टींची काळजी घ्या

Webdunia
मंगळवार, 22 ऑगस्ट 2023 (15:41 IST)
Long Drive Tips : सध्या पावसाळा सुरु आहे. सर्वत्र हिरवळ आहे. या दिवसांत सहलीचा आनंद घेण्यासाठी लाँग ड्राइव्ह जाण्याचा बेत आखतात. पावसाळ्यात लाँग ड्राईव्हला जात असाल तर तुम्हाला अतिरिक्त सावधगिरी बाळगावी लागेल. आल्हाददायक पावसाळ्यात कुटुंब आणि मित्रांसोबत लाँग ड्राईव्हला जाण्याची मजा काही औरच असते. थांबणे, मजा करणे, एका शहरातून दुसऱ्या शहरात जाणे आणि तेथील गोष्टींचा आनंद घेणे खूपच आल्हाददायक आहे.मात्र पावसाळ्यात लाँग ड्राईव्हवर जाणे कधीकधी अडचणी निर्माण करते.लाँग ड्राईव्हला जाण्यापूर्वी काही गोष्टीना जाणून घ्या आणि या टिप्स लक्षात ठेवा. जेणे करून तुम्हाला  लाँग ड्राईव्ह करताना काही त्रास होऊ नये. चला तर मग जाणून घेऊ या. 
 
कार सर्व्हिसिंग करून घ्या -
जर तुम्ही कारने लाँग ड्राईव्हवर जाण्याचा विचार करत असाल, तर आधी त्याची सर्व्हिसिंग करून घेणे अत्यंत आवश्यक आहे, कारण तुमची कार अशा ठिकाणी बिघडली जिथे जवळपास कोणतेही गॅरेज नाही, तर तुम्हाला आणि इतरांना  त्रासाला सामोरे जावे लागेल . अशा परिस्थितीत प्रवासाची मजा जाईल. हे टाळण्यासाठी वाहनाची सर्व्हिसिंग करून घेऊनच प्रवासाला जावे. विशेषतः वाहनाचे लाईट, ब्रेक, एअर बॅग, टायर इत्यादी तपासायला विसरू नका. या गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुमचा प्रवास सुखकर होईल.
 
टूल्स किट तपासा -
लांब कार ड्राइव्हवर जाताना, टूल्स किट वाहनात ठेवली आहे की नाही ते तपासा. जर ठेवले नसेल तर काळजीपूर्वक गाडीत ठेवा आणि बॉक्समध्ये सर्व साधने आहेत की नाही ते तपासून घ्या. आपण स्वतंत्रपणे टायर घ्यावे. कधी गाडीचा टायर पंक्चर झाला तर प्रवासात अडचण होऊ शकते.
 
कागदपत्रे सोबत ठेवा -
तुम्ही गाडीने प्रवास करणार असाल तर तुमच्या महत्त्वाच्या कागदपत्रांच्या फोटो कॉपी सोबत ठेवा, तसेच तुमच्या पतीला ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड, विमा, प्रदूषणाशी संबंधित सर्व कागदपत्रे यांसारखी महत्त्वाची कागदपत्रे घेऊन जाण्यास सांगा. ते कॉपी करून ठेवा, जेणेकरून ही कागदपत्रे तुम्हाला अडचणीच्या वेळी उपयोगी पडतील आणि तुम्हाला त्रास टाळता येईल.
 
अत्यावश्यक औषधे जवळ बाळगा- 
लाँग ड्राईव्हवर जाताना तुम्ही तुमच्या सोबत औषधे घेऊन जाणे आवश्यक आहे. याशिवाय गॅस, अपचन, पोटदुखी, डोकेदुखी, जुलाब थांबवणारी औषधे सोबत ठेवावीत. ही औषधे तुमच्यासोबत ठेवल्याने तुम्ही कोणत्याही अडचणीशिवाय तुमच्या प्रवासाचा आनंद घेऊ शकता.
 
ओव्हरलोडिंग करणे टाळा-
पावसाळ्यात प्रवास करताना गाडीचे ट्रंक लोड करू नका. जड सामान घेऊन गेल्याने गाडी चालवायला त्रास होतोच, त्याशिवाय गाडी सोडून दूर कुठेतरी जावे लागले तर सामानाची चिंताही कायम असते. त्यामुळे कमी सामानासह प्रवास करा.
 
सोबत ड्रायव्हर घेऊन जा- 
जर तुम्ही लांबच्या ड्राईव्हवर जात असाल, तर तुमच्या मित्राला किंवा कुटुंबातील सदस्याला सोबत घ्या ज्याला गाडी कशी चालवायची हे माहीत आहे, जेणेकरून तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल किंवा थकल्यासारखे वाटत असेल किंवा इतर कोणतीही समस्या असेल तर तो तुम्हाला मदत करू शकेल. अशा व्यक्तीला प्रवासात सोबत घेणं खूप गरजेचं असतं.
 
हवामानाची माहिती करा- 
जर तुम्ही पावसाळ्यात लांब कार चालवण्याचा विचार करत असाल, तर सर्वप्रथम तुम्ही ज्या ठिकाणी किंवा शहराला भेट देणार आहात त्या ठिकाणाचा हवामान अंदाज तपासा. आजकाल जीपीएस तुम्हाला बर्‍याच प्रमाणात मदत करते, परंतु सर्वत्र ते तितकेसे प्रभावी नाही. कधीकधी नेटवर्कची समस्या देखील असते. त्यामुळे तुम्ही ज्या ठिकाणाला भेट देणार आहात, त्या ठिकाणाचा नकाशा तुमच्यासोबत ठेवा, जेणेकरून तुम्हाला तुमचा प्रवास कोणत्याही त्रासाशिवाय आरामात पूर्ण करता येईल.
 
 




Edited by - Priya Dixit 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

हिवाळ्यात सूर्यप्रकाश घेण्याची योग्य पद्धत कोणती आहे, जाणून घ्या

केसगळतीच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी या एका गोष्टीने केस गळती वर उपचार करा

हिवाळ्यात शरीरात पाण्याच्या कमतरते मुळे होऊ शकतो हृदयविकाराचा धोका

या 5 चुका वैवाहिक जीवन पूर्णपणे उद्ध्वस्त करतात

आरोग्यवर्धक खजूर आणि तिळाची चिक्की

पुढील लेख
Show comments