Dharma Sangrah

मुलांचे संगोपन करताना मुलांना देखील आदर द्या अन्यथा....

Webdunia
मंगळवार, 2 मार्च 2021 (08:25 IST)
मुलं हे कच्च्या माती प्रमाणे असतात त्यांना कसं घडवायचे आहे ते आपल्यावर अवलंबवून आहे. मुलं मोठी झाल्यावर चांगले नाव करावे,त्यांची प्रगती व्हावी असं प्रत्येक पालकाची इच्छा असते.असं तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण मुलांच्या चांगल्या संगोपनाकडे चांगल्या प्रकारे लक्ष द्याल.चांगल्या संगोपनात काही अशा गोष्टी असतात ज्यांना पालक दुर्लक्षित करतात आणि ते आहे मुलांना आदर देणं. चला तर मग जाणून घेऊ या की काय करणे टाळावे.
 
* तुच्छ लेखू नका-
मुलांना त्यांच्या भाऊ बहिणीं समोर रागावू नये. कोणतेही कारण असो मुलाने काही गैरवर्तन केले असेल, खोटं बोलले असेल आपल्याला राग येणं साहजिक आहे परंतु काहीही झाले तरी त्याला लहान भाऊ बहिणी समोर तुच्छ लेखू नका. असं केल्यानं लहान भाऊ बहीण देखीलमोठ्या भावाला मान देणार नाही. ते देखील त्याची चेष्टा करतील.म्हणून असं करू नका.    
 
 
* रागावर नियंत्रण ठेवा- 
समजा मुलाने काही तोडले आहे किंवा एखादी वस्तू गहाळ केली आहे. त्यासाठी आपण त्याच्या वर रागावू नका. मुलांना चारचौघात अपमानित करू नका. त्याला एकट्यात विचारा त्याचा वर राग न करता प्रेमाने एकट्यात विचारा.त्याचा कडून असं का घडले ते जाणून घ्या आणि प्रेमाने त्याला समजावून सांगा जेणे करून त्याच्या कडून अशी चूक पुन्हा होणार नाही. मारल्याने किंवा राग केल्याने त्याच्या कोवळ्या मनावर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यात बंडखोरीची भावना वाढू शकते किंवा तो नैराश्याला वेढला जाऊ शकतो.
 
* मुलाचे दोष दाखवू नका-
नेहमी मुलाला आळशी, वाईट असं बोलू नका.जेवढे आपण त्याच्या वर रागवालं किंवा त्याच्या उणीव दाखवाल तो चुकीच्या मार्गावर जाईल. बऱ्याच वेळा पालक नेहमी दुसऱ्यानं समोर मुलाच्या उणीव  किंवा त्यातील कमतरता सांगतात. असं  केल्याने त्याच्या मध्ये नकारात्मक विचार विकसित होतात. या उलट मुलांमधील गुणांना सर्वांना सांगा त्याचे कौतुक करा असं केल्यानं त्याच्या मध्ये सकारात्मक भाव येतील आणि त्याच्या मनात अधिक प्रशंसा मिळविण्यासाठीची भावना जागृत होते. 
 
* मुलाच्या इच्छेस मान द्या-
प्रत्येक मुलं दुसऱ्यापेक्षा वेगळं असत. प्रत्येकात काही गुण अवगुण असतात .प्रत्येक मुलांमध्ये वेगवेगळे कौशल्ये असतात.मुलाची आवड निवड वेगळी असते. मुलाला जे करण्याची आवड आहे ते त्याला करू द्या . त्याला त्याचे निर्णय घेऊ द्या. जेणे करून त्याच्या मनात गुदमरलेले, फ्रस्टेशन, तणाव, राग उद्भवणार नाही. त्याच्या मनात जिव्हाळा ,प्रेम आपुलकी आणि आनंदाचा संचार होईल.तो आपल्याला देखील प्रेम आणि मान देईल आणि इतरांना देखील मान देईल. 
 
* मुलाला टोपण नाव देऊ नका- 
बऱ्याच वेळा पालक आपल्या मुलाला पिंकू,रिंकू, गोलू असं नाव देतात. चुकून देखील असं नाव देऊ नका. त्याला त्याच्या नावानेच हाक द्या. असं केल्याने त्याच्या मनात सकारात्मक ऊर्जा संचारते.    
 
* मुलाला आदरार्थी बोलावं- 
काही चांगल्या कुटुंबाचे लोकं मुलांना आदरार्थी बोलतात. जसं की आपण आज कुठे गेला होतात. आपण काय करत आहात. असं केल्यानं मुलांमध्ये सभ्य आणि शिष्टताचे घडण होत. टोचून तू तडक किंवा उद्धटपणे बोलल्यावर त्यांच्या वर देखील असेच संस्कार येतात आणि ते देखील उद्धटपणे बोलू लागतात. या मुळे आपल्याला इतरांपुढे मान खाली घालावी लागू शकते.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

हिवाळ्यात नाश्त्यात हे पदार्थ खाणे टाळा; सर्दी आणि संसर्ग होण्याचा धोका वाढू शकतो

Double Date मुली डबल डेट का पसंत करतात? तुम्हाला डबल डेटिंगबद्दल माहिती आहे का?

Proper method of roasting peanuts तेल किंवा तूप न घालता शेंगदाणे भाजण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

हिवाळ्यात बनवा पौष्टिक असे Fish kebab

पुढील लेख
Show comments