Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Superfood महिलांसाठी सुपरफूड, हे महिलांना तंदुरुस्त ठेवतील आणि सौंदर्यांत वाढ होईल

Webdunia
शुक्रवार, 24 जून 2022 (09:05 IST)
धावपळीच्या जीवनात महिलांचे जीवन अत्यंत व्यस्त असते. घरच्या लोकांची तसेच मुलांची आणि आता कामाची जबाबदारी आल्याने घर आणि ऑफिस सांभाळताना अनेक वेळा महिलांना त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देता येत नाही, त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू लागतात. निरोगी राहण्यासाठी महिलांनी सकस आहार घेणे आवश्यक आहे. मासिक पाळी, गर्भधारणा आणि रजोनिवृत्तीपर्यंत महिलांच्या आयुष्यात अनेक बदल होत असतात. अशा परिस्थितीत महिलांनी त्यांच्या जीवनशैलीत अशा काही सुपरफूडचा समावेश करणे आवश्यक आहे, जे त्यांच्या आरोग्याची आणि सौंदर्याची काळजी घेऊ शकतात.
 
महिलांसाठी सुपरफूड
टोमॅटो- टोमॅटो खाल्ल्याने त्वचा चांगली राहते आणि वृद्धत्वाची लक्षणे कमी होण्यास मदत होते. टोमॅटोमध्ये लाइकोपीन नावाचे पोषक तत्व असते, ज्यामुळे स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो. यामध्ये मजबूत अँटिऑक्सिडंट्स असतात जे हृदयरोगाशी लढण्यास मदत करतात.
 
बेरी- महिलांच्या आरोग्यासाठीही बेरीज खूप फायदेशीर असतात. स्ट्रॉबेरी, रास्पबेरी, ब्लूबेरी आणि क्रॅनबेरीमध्ये कॅन्सरविरोधी पोषक असतात. बेरी व्हिटॅमिन सी आणि फॉलिक ऍसिडचा चांगला स्रोत आहेत. गरोदरपणातही बेरी खाण्याचा सल्ला दिला जातो. बेरीमध्ये वृद्धत्वविरोधी घटक देखील आढळतात. याशिवाय बेरी युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन कमी करण्यासही मदत करतात.
 
दूध- महिलांमध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीची कमतरता पुरुषांपेक्षा जास्त असते. अशा परिस्थितीत महिलांनी कमी फॅटयुक्त दुधाचा आहारात समावेश करावा. शरीरातील व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमची कमतरता दुधाने भरून काढता येते. व्हिटॅमिन डी महिलांमध्ये ऑस्टिओपोरोसिसचा धोका कमी करते. मधुमेह, मल्टिपल स्क्लेरोसिस आणि स्तन आणि अंडाशयातील ट्यूमरचा धोका देखील कमी होतो.
 
बीन्स- बीन्समध्ये प्रथिने आणि फायबर मुबलक प्रमाणात असतात. बीन्समध्ये फॅट खूप कमी असते. बीन्स खाल्ल्याने हृदयविकार आणि स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो. बीन्स महिलांसाठी सर्वात फायदेशीर आहे. ते खाल्ल्याने हार्मोनल बॅलन्स राहतो. बीन्स खाल्ल्याने ब्रेस्ट कॅन्सरचा धोकाही कमी होतो. बीन्स खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल कमी होते आणि पेरीमेनोपॉज दरम्यान हार्मोनल बदल स्थिर होतात.
 
दही- आपल्या आरोग्याची काळजी घेत महिलांनी दही अर्थात कमी चरबीयुक्त दह्याचा आहारात नक्कीच समावेश करावा. अनेक संशोधनात असे आढळून आले आहे की दही खाल्ल्याने स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो. पोटाशी संबंधित समस्याही दही खाल्ल्याने दूर होतात. याशिवाय दही खाल्ल्याने अल्सर आणि योनीमार्गात संसर्ग होण्याचा धोकाही कमी होतो. हाडे मजबूत करण्यासाठी दही कॅल्शियमचा चांगला स्रोत आहे.
 
फॅटी फिश- जर तुम्ही मांसाहारी असाल तर आहारात माशांचा नक्कीच समावेश करा. महिलांनी त्यांच्या जेवणात सॅल्मन, सार्डिन आणि मॅकरेल मासे खाणे आवश्यक आहे. माशांमध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड असते. यामुळे तुमच्या त्वचेशी संबंधित समस्या, हृदयविकार, पक्षाघात, उच्च रक्तदाब, नैराश्य, सांधेदुखी आणि जळजळ कमी होते. मासे खाल्ल्याने अल्झायमरच्या जोखमीपासूनही तुमचे संरक्षण होते.
 
सोयाबीन- महिलांनी प्रथिने युक्त आहार घ्यावा. प्रथिने, लोह आणि व्हिटॅमिन बी असलेले अन्न तुम्ही अन्नात घेतले पाहिजे. सोयापासून बनवलेली उत्पादने जसे की सोया मिल्क, टोफू महिलांसाठी खूप फायदेशीर आहेत.
 
एवोकॅडो- हे एक अतिशय पौष्टिक फळ आहे, अॅव्होकॅडोमध्ये भरपूर फायबर, जीवनसत्त्वे, खनिजे आणि हेल्दी फॅट आढळते. महिलांसाठी एवोकॅडो खूप फायदेशीर आहे. एवोकॅडोमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स (MUFAs) असतात. एवोकॅडोमध्ये फॉलिक अॅसिड भरपूर असते. त्यामुळे शरीरातील जळजळ होण्याची समस्याही कमी होते. एवोकॅडोमुळे हृदयरोग, मधुमेह, मेटाबॉलिक सिंड्रोम आणि कर्करोगाचा धोका देखील कमी होऊ शकतो.
 
आवळा- आवळा महिलांसाठी खूप फायदेशीर आहे. आवळ्यामध्ये सर्वात जास्त व्हिटॅमिन सी असते. आवळा रोज खाल्ल्याने तुमची प्रतिकारशक्ती मजबूत होते. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी व्यतिरिक्त पोटॅशियम, कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन ए, बी, फायबर, प्रोटीन, लोह आणि मॅग्नेशियम आढळतात. आवळा पोटासाठीही खूप चांगला आहे.
 
हिरव्या भाज्या- महिलांनी हिरव्या भाज्यांचे भरपूर सेवन करावे. सर्व आवश्यक जीवनसत्त्वे हिरव्या भाज्यांमध्ये आढळतात. पालक महिलांसाठी चांगला स्त्रोत आहे. पालकामध्ये तुम्हाला प्रथिने, लोह, व्हिटॅमिन बी, कॅल्शियम आणि अनेक महत्त्वाची खनिजे मिळतात.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

हिवाळ्यात सूर्यप्रकाश घेण्याची योग्य पद्धत कोणती आहे, जाणून घ्या

केसगळतीच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी या एका गोष्टीने केस गळती वर उपचार करा

हिवाळ्यात शरीरात पाण्याच्या कमतरते मुळे होऊ शकतो हृदयविकाराचा धोका

या 5 चुका वैवाहिक जीवन पूर्णपणे उद्ध्वस्त करतात

आरोग्यवर्धक खजूर आणि तिळाची चिक्की

पुढील लेख