rashifal-2026

नात्याला कमकुवत करतात या चुका

Webdunia
मंगळवार, 2 मार्च 2021 (21:07 IST)
एखादं जोडपं नात्यात असतात तेव्हा कळत नकळत त्यांच्या कडून काही चुका होतात. प्रत्येक माणसाकडून चुका होणं साहजिक आहे. परंतु चुका अक्षम्य नसाव्यात. एखाद्या नात्यात गुंतलेल्या जोडप्याना देखील आपल्या नात्याला घट्ट ठेवण्यासाठी काही चुका होऊ नये याची दक्षता घ्यावयाची आहे. नातं जपण्यासाठी खूप काळजी घेण्याची आवश्यकता आहे. जेणे करून नात्यात दुरावा येऊ नये. तरीही काही चुका झाल्या तर लगेच एकमेकांशी बोलून गैरसमज दूर करून नात्याला सांभाळावे.बऱ्याच वेळा असे आढळून आले आहे की या नात्यात काही लोक आपल्या जोडीदाराला नको त्यावेळी मेसेज पाठवतात. त्यामुळे देखील नात्यात दुरावा येतो. आपल्या नात्याला जपण्यासाठी त्यामध्ये विश्वास आणि प्रेम असावे. आणि हे दोन्ही जपण्यासाठी काही चुका करणे टाळावे चला तर मग जाणून घेऊ या कोणत्या आहे  त्या चुका जे जोडपे करतात आणि या चुका कोणीही करू नये.  
 
1 रोमान्स मध्ये कमी -
एकेवेळी आपण विसरता की नात्यात प्रेमाची आवश्यकता आहे. असं म्हणतात की प्रेमाला दाखवले जात नाही त्याला अनुभवतात. जर आपण एखाद्यावर प्रेम करतात तर तो आपल्या प्रेमाला समजून घेईल जर आपण एखाद्यावर प्रेम करता तर त्याच्यावर आपल्या प्रेमाला दर्शवा. असं केल्याने त्याला एक आनंद मिळेल. नात्याला टिकविण्यासाठी त्यामध्ये रस घाला. असं केल्यानं नातं बहरेल. 
 
* परिपूर्ण जोडीदाराची अपेक्षा करू नका- 
या जगात कोणीही परिपूर्ण नसत. प्रत्येक गोष्टींमध्ये जोडीदाराला अडवू नका त्याला टोकू नका. त्याचे दोष दाखवून देऊ नका.तिचा कडून चूक झाली असेल तर तिला न रागावता समजावून सांगा. वारंवार दोष दिल्याने तिचा किंवा त्याच्या मधील आत्मविश्वास कमी होतो.हे आवश्यक आहे की त्याच्या कडून जास्त अपेक्षा करू नका. 
 
3 सामोरा समोर येणं टाळणे -
 बऱ्याचवेळा असा विचार करतो की भांडणे संपविण्यासाठी त्याच्या विषयी बोलूच नये, न बोलता वाद किंवा भांडणे संपत नसतात तर अधिकच वाढतात. दोघांमध्ये भांडणे असल्यास बोलून त्याला मिटविण्याचा प्रयत्न करा. समोर येऊन त्यावरील समाधान काढा.असं केल्याने आपण समस्या मिटवू शकाल. आपसातील भांडणे किंवा वाद इतर कोणाला सांगू नका. असं केल्याने लोक आपली चेष्टा करतील.आपले भांडण समोरासमोर येऊन सोडवा. 
 
4 जास्त बंधने घालू नका- 
आपल्या नात्याला मोकळीक द्या. जास्त ढवळाढवळ करू नका. प्रत्येकाचे आपले खासगी आयुष्य असते त्यामध्ये जास्त बंधने लावूं नका आणि नात्याला अधिक बांधून ठेवू नका. अन्यथा नात्यात दुरावा येण्यास सुरुवात होते. 
 
5 स्वतःला बदलण्याच्या प्रयत्न करा- 
दुसऱ्याने आपल्यासाठी बदलायलाच पाहिजे असा अट्टाहास करू नका. आपण देखील आपल्या जोडीदारासाठी बदलण्याच्या प्रयत्न करा जेणे करून त्याला आनंद मिळेल. आपल्यावर ज्याला प्रेम आहे तो आपल्याला समजून घेईल प्रेम म्हणजे एक मेकांना समजून घेणं असते.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

हिवाळ्यात बनवा पौष्टिक असे Fish kebab

International Anti Corruption Day 2025 आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस संपूर्ण माहिती

Turmeric vegetable पौष्टिकतेने समृद्ध रेसिपी हळदीची भाजी

वजन कमी करण्यासाठी मखान्याचे सेवन करा

पुढील लेख
Show comments