Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

फेकू नका यूज्ड टी बॅग

Webdunia
ग्रीन टी असो वा ब्लॅक टी. एकदा वापरल्यावर लोकं त्याला फेकून देतात. पण येथे आम्ही यूज्ड टी बॅगचा उपयोग कशाप्रकारे करू शकतो हे सांगत आहोत:
* पास्ता किंवा ओट्स बनवताना टी बॅग जवळ ठेवा. याने हे पदार्थ अजून स्वादिष्ट होतात.
 
* फ्रीजमध्ये विविध खाद्य पदार्थ ठेवण्यात येतात त्यामुळे अनेकदा असह्य वास यायला लागतो. अशात यूज्ड टी बॅग्ज फ्रीजमध्ये ठेवावे. याव्यतिरिक्त ड्राय टी बॅग ऐश ट्रे किंवा डस्टबिनमध्ये ठेवली तर दुर्गंध दूर होतो.
 
* ग्रीन टी किंवा पिपरमिंट टी बॅग्ज हलक्या गरम पाण्यात भिजवा. आता याला सामान्य तापमानावर गार होऊ द्या. हे घरगुती नैसर्गिक अल्कोहल फ्री माउशवाश तयार झाले आहे.
 
* टी बॅग्जने आपण खिडक्यांचे काच आणि ड्रेसिंग टेबलाचे काच स्वच्छ करू शकता. यूज्ड टी बॅग्ज या काचेवर घासल्याने ते नव्या सारखे दिसू लागतील.

* ड्राय टी बॅगमध्ये आवडीप्रमाणे तेलाचे थेंब टाकून घरगुती एअरफ्रेशनर तयार होतं. हे कार, किचन किंवा बाथरूममध्ये ठेवू शकता.
 
* ड्राय, अनयूज्ड टी बॅग कपाटात किंवा रॅकमध्ये ठेवल्याने तिथे उंदीर, मुंग्या आणि कोळी येत नाही.
 
* टी बॅग घालून उकळेल्या पाण्यात कपडा भिजवावा. याने लाकडाचे फर्निचर आणि फ्लोअर स्वच्छ करता येतं.
 
* किचनच्या सिंकमध्ये कोमट पाणी आणि 2-3 यूज्ड टी बॅग्ज टाकावे. याने भांड्यातील चिकटपणा कमी होईल आणि आपण सोपेरित्या भांडी स्वच्छ करू शकता.
 
* यूज्ड टी बॅग कुंड्यांच्या मातीत टाकल्याने हे कंपोस्ट सारखे उपयोगी ठरतं.

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

Career in Master of Applied Management : मास्टर ऑफ अप्लाइड मॅनेजमेंट मध्ये करिअर करा

अचानक ब्लड प्रेशर वाढल्यास हा योगाभ्यास करणे

चविष्ट आलू जलेबी

Bra Wearing Benefits रोज ब्रा घालण्याचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर बनून करिअर करा, पात्रता जाणून घ्या

पुढील लेख
Show comments