Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तिचा नकार....महत्त्वाचा आहे का?

तिचा नकार....महत्त्वाचा आहे का?
webdunia

रूपाली बर्वे

, बुधवार, 21 ऑक्टोबर 2020 (19:15 IST)
ती खूप अंतरंगी आहे, तिचं काय? मूड असेल तर चांगलं बोलेल नाही तर काही खरं नाही, आपण नेहमीच तिच्या म्हणण्याप्रमाणे वागायचं का?, जाऊन दे तिची नेहमीचीच कटकट आहे? आता तर ती हो म्हणाली होती मग... मी तरी काय करणार... असे अनेक वाक्य आपण तिच्याबद्दल सातत्याने ऐकत असतो...जेव्हा ही ती चिडते, रागावते, त्रागा करते, रडते तेव्हा तेव्हा तो हेच म्हणतो.... हे तर नेहमीच आहे... त्यात काय नवं... पण ती अशी का वागतेय? तिचा मूड का गेलाय, तिची चिडचिड नेमकी कशामुळे होतेय? हे जाणून घेण्याचा तो कधीच प्रयत्न करत नाही कारण त्याला तिला समजून घेयचं नाहीये कारण देवाने दोघांच्या शारीरिकच नव्हे तर मानसिक संरचना देखील वेगळ्याने आखल्या आहे.
 
स्त्रिया भावनिक असल्याचे मुख्य कारण म्हणजे आमच्या सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टीकोनातून त्यांच्यावर घातलेले बंधन. त्यांच्यावर पडणार्‍या वेगवेगळ्या जवाबदार्‍यांमुळे त्या पुरुषांपेक्षा अधिकच तणावाखाली जगतात. शारीरिक दृष्ट्या बघितले तर मासिक पाळी, गरोदरपणा, प्रसूती आणि नंतर रजोनिवृत्ती. हे सर्व स्त्रियांमध्ये आढळल्यामुळे नैराश्य आणि इतर भावनिक समस्या तसेच मानसिक ताण सहन करणे त्या आपल्या भाग्यात घेऊन येतात. तरी स्त्री पुरुषापेक्षा ताणतणावाच्या परिस्थितीत जास्त चिकाटीने तग धरते. शारीरिक त्रास सहन करूनही कुटुंबाची जबाबदारी पार पाडण्याची नैसर्गिक ताकद जणू तिला देवाचा आशीर्वाद समजावा. त्यातून सध्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या राहण्याची हौस स्त्रियांना सशक्त असल्याची जाणीव नक्कीच करून देत आहे पण आधुनिकतेची आव्हाने पेलताना तिची दमछाक होते. 
 
घरातून बाहेर पडल्यावर तिलाही बाहेरच्या जगात रमण्याचं मन होतं, ती ते आनंदाचे क्षण जगू देखील बघते पण कुठेतरी कुटुंबाला वगळून आनंदाचे हे क्षण तिला दोषी असल्याचे जाणीव करून देतात. अनेकदा शारीरिक रूपात ती कुठेही असली तरी मानसिक रुपाने कुटुंबात गुंतलेली असते, याचे कारण फक्त आणि फक्त पूर्वीपासून समाजाने घातलेले बंधन. काळ बदलला असला तरी तिच्या जबावदार्‍या कमी न होत उलट वाढतच चालल्या आहेत. संस्कृतीरक्षकांची मर्जी राखण्यात स्त्रिया आजही मानसिक तणावाच्या चक्रात अडकून आहेत.
 
हे चक्र केवळ जवाबदार्‍यांवरच थांबत नाही तर लैंगिक शोषण, मानसिक आणि शारीरिक छळ त्यात भर घालत असतं. आज कितीही सुशिक्षित कुटुंब दिसत असलं तरी पुरुषार्थ सिद्ध करण्यासाठी बायकांवर जोर दाखवण्याची वृत्ती तशीच आहे. अशात स्त्रिया पुरुषांपेक्षा कितीतरी पट सहनशील आणि बळकट आहे हे सांगण्याची वेगळ्याने गरज भासत नाही. तिच्या ओठांवर कधीही नकार नसतोच कारण नकार दिल्यावर समाजाने आखलेल्या चौकटीत आपण एक संपूर्ण स्त्री म्हणून बसत नाही किंवा एक मुलगी, एक बहीण, एक पत्नी, एक सून, एक आई म्हणून आपण अपयशी होत असल्याची भावना तिलाच तिची खाऊ लागते. आणि येथून सुरू होतो प्रवास स्त्री मानसिक रुपाने कमकुवत असल्याचे सिद्ध करण्याचा. 
 
आज किती तरी नवीन जोडपे गोडी-गुलाबीने संसार करताना बायकोला सर्व स्वातंत्र्य असल्याचं सांगत असले तरी वेळ पडल्यावर अगदी शालजोडीतून तू तुझी जबाबदारी पार पडण्यात किती कमी पडते हे दाखवायला मागे पुढे बघत नाही.
 
फक्त गरज आहे तिला नकार देण्याची हिंमत देण्याची. मग तो नकार न कळत बळजबरीने तिच्या अंगावर घातलेल्या जबावदार्‍यांचा असो, तिला आवडत नसलेल्या एखाद्या पदार्थाची चव असो, तिचा छंद नसलेल्या गोष्टी असो वा शारीरिक संबंधासाठी दिलेला नकार असो. कारण नकार देणे तिचा हक्क आहे हे ती विसरून गेली आहे किंबहुना तिला लहानपणापासून हे विसरायला भाग पाडलेले आहे. नकार दिल्यामुळे तिला कमी न आखता तिच्यासोबत सामान्य व्यवहार केल्यास पुरुष हे माणूस असल्याचं सिद्ध करू शकतात. तिच्या नकाराला सन्मान द्या आणि बघा ती आणखीच निखार येईल आणि ती अजून आत्मविश्वासाने आपल्याला यशाच्या पायर्‍या चढण्यास मदत करेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हे योगासन उदासीनता आणि अस्वस्थ मनाला शांत करतं